आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पर्थ/ ब्रिस्बेन- टेनिस विश्वातील राॅजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स हे दाेघेही दिग्गज मंगळवारी समाेेरासमाेर आले हाेते. या दाेघांमध्ये हाेपमन चषक टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचा सामना रंगला. स्वीसच्या फेडररने आपली सहकारी बेलिंडासाेबत या सामन्यात फ्रान्सेस आणि सेरेनावर मात केली. त्यांनी ४-२, ४-३ अशा फरकाने मात केली. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये १४ हजार चाहत्यांची खास उपस्थिती हाेती.
मरेचे तीन महिन्यांनंतर पुनरागमन
तीन वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन अँडी मरेने आता टेनिस काेर्टवर दमदार पुनरागमन केले. तीन महिन्यांनंतर कमबॅक करताना त्याने ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यासाठी त्याला पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात ९० मिनिटे शर्थीची झुंज द्यावी लागली.
मरेचा सलामीला राेमहर्षक विजय
इंग्लंडच्या मरेने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा पराभव केला. त्याने ६-३, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला यंंदाच्या सत्रात पहिल्या किताब जिंकण्याच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात करता आली. यादरम्यान अव्वल खेळी करताना मरेने प्रतिस्पर्धी डकवर्थची सर्व्हिस तीन वेळा ब्रेक केली. यातून त्याने आपला विजयाचा दावाही मजबूत केला.
स्लाेएन स्टिफन्सचा पराभव; काेटांचा सनसनाटी विजय
महिला एकेरीच्या गटात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्लाेएन स्टिफन्सला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या जाेहाना काेंटाने महिला एकेरीच्या सलामीला सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या स्टिफन्सवर मात केली. तिने ६-४, ६-३ ने सामना जिंकला. तसेच जपानच्या ओसाकाने सलामीला ऑस्ट्रेलियाच्या डेस्टेनी आवावर विजय मिळवला. तिने ६-३, ६-२ ने मात दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.