आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेस्टन चासे भारताविरुद्ध सलग दुसऱ्या शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या सामन्यातही सुरक्षेला तडा; कारवाईची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - सलामीच्या पराभवातून सावरलेल्या पाहुण्या विंडीज संघाने शुक्रवारी यजमान भारताविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या दिवशी दमदार खेळी केली.राेस्टन चासे (नाबाद ९८) अाणि कर्णधार जेसन हाेल्डरने (५२) उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर अर्धशतके झळकावली. या खेळीच्या बळावर विंडीज संघाने दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात दिवसअखेर सात गड्यांच्या माेबदल्यात २९५ धावा काढल्या. विंडीजचा राेस्टन चासे अाणि देवेंद्र बिशू (नाबाद २) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. तसेच चासे अाता भारताविरुद्ध सलग दुसऱ्या शतकाच्या उंबरठ्यावर अाहे. यापासून ताे दाेन पावलांवर अाहे. त्याने करिअरमध्ये तीन शतके केली. यातील एक शतक भारताविरुद्ध केले हाेते. त्यानंतर अाता त्याला दुसरे शतक करण्याची संधी अाहे. त्याचे हे करिअरमधील चाैथे व भारतविरुद्ध सलग दुसरे शतक असेल. 


भारताकडून युवा गाेलंदाज कुलदीप यादव (३/७४) अाणि उमेश यादवने (३/८३) प्रत्येकी तीन बळी घेतले. तसेच अश्विनने एक गडी बाद केला. अाता दुसऱ्या कसाेटीतही विजयाच्या इराद्याने यजमान टीम इंडिया मैदानावर उतरली अाहे. यासाठी युवांनी शानदार गाेलंदाजी केली. 
मालिकेतील शेवट गाेड करण्यासाठी उत्सुक असलेल्या विंडीजने नाणेफेक जिंकली. यासह कर्णधार हाेल्डरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर कार्लाेस ब्रेथवेट (१४) अाणि पाॅवेलने (२२) संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी संघाला ३२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, अश्विनने ही जाेडी फाेडली. 

 

सुरक्षा भेदून काेहलीसाेबत सेल्फी 
दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात खेळताना टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीला एका वेगळ्याच प्रकरणाला सामाेरे जावे लागले. हैदराबाद मैदानावरची सुरक्षा व्यवस्था भेदून एक चाहता थेट खेळपट्टीवर अाला. त्याने यादरम्यान काेहलीशी गळाभेट घेतली. त्यानंतर त्याने काेहलीसाेबत एक सेल्फीही काढली.

 

हाेल्डर-चासेची शतकी भागीदारी 
जबरदस्त लयात अालेल्या चासेने अर्धशतकाचा पल्ला यशस्वीपणे पार केला. त्याला कर्णधार जेसन हाेल्डरची महत्त्वाची साथ मिळाली. या दाेघांनी सातव्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. 

 

धावफलक 
वेस्ट इंडीज (पहिला डाव) धावा चेंडू ४ ६ 
ब्रेथवेट पायचीत गाेे. कुलदीप यादव १४ ६८ ०२ ० 
पाॅवेल झे. जडेजा गाे. अश्विन २२ ३० ०४ ० 
शाई हाेप पायचीत गाे. उमेश यादव ३६ ६८ ०५ ० 
हेटमेयर पायचीत गाे. कुलदीप यादव १२ ३४ ०२ ० 
अाम्ब्रिस झे. जडेजा गाे. कुलदीप यादव १८ २६ ०३ ० 
राेस्टन चासे नाबाद ९८ १७४ ०७ १ 
ड्राेविच पायचीत गाे. उमेश यादव ३० ६३ ०४ १ 
हाेल्डर झे. ऋषभ गाे. उमेश यादव ५२ ९२ ०६ ० 
देवेंद्र बिशू नाबाद ०२ १५ ०० ० 
अवांतर : ११ . एकूण : ९५ षटकांत ७ बाद २९५ धावा. गाेलंदाजी : उमेश यादव २३-२-८३-३, शार्दूल ठाकूर १.४-०-९-०, अश्विन २४.२-४९-१, कुलदीप यादव २६-२-७४-३, रवींद्र जडेजा २०-२-६९-०. 

बातम्या आणखी आहेत...