आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा भाजपचा राजकीय डाव; आपल्या लोकांना राहुल गांधी यांनी आवरले पाहिजे : अनुपम खेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित चित्रपट अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर यावरून वादंग सुरू झाले आहे. लोकसभेच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होऊ घातल्याने काँग्रेसने हा भाजपचा राजकीय डाव असल्याचे संबोधले आहे. चित्रपट पडद्यावर झळकण्यापूर्वी तो पक्षाच्या जबाबदार नेत्यांना आधी दाखवला जावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. चित्रपटांना विरोध करण्याची काँग्रेसची जुनीच परंपरा आहे, अशा शब्दांत भाजपने काँग्रेसला उत्तर दिले आहे. अलीकडेच राहुल गांधी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला होता. आता त्यांनी आपल्या लोकांना आवरले पाहिजे. त्यांना समज दिली पाहिजे, असे अभिनेता अनुपम खेर यांनी म्हटले आहे. हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

शुभेच्छा देण्याचे स्वातंत्र्य नाही? :
भाजप -चित्रपटाचा ट्रेलर जारी झाल्यानंतर त्याचा बचाव करताना केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी चित्रपटाला शुभेच्छा देण्याचेही आम्हाला स्वातंत्र्य नाही का? असा प्रश्न विचारला. हा चित्रपट संजय बारू यांच्या चित्रपटावर आधारित आहे. हे पुस्तक २०१४ पासून बाजारात आहे. मग आता काय चित्रपटाला काँग्रेस सेन्सॉर करणार आहे का ? असा प्रतिप्रश्न भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी विचारला आहे. पूर्वीही अनेक चित्रपटांबद्दल हे घडले आहे. दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावर आधारित 'आंधी' चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती. 'किस्सा कुर्सी का' या चित्रपटावेळी देखील असे घडले होते. तेव्हाही राजकीय क्षेत्रात मोठे वादंग माजले होते.

 

' प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न, काही दृश्ये हटवा'
काँग्रेस नेत्या शोभा आेझा म्हणाल्या, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काँग्रेसच्या जबाबदार नेत्यांना दाखवण्यात यावा. ट्रेलरमध्ये काही आक्षेपार्ह दृश्ये व संवाद दिसून येतात. त्यामाध्यमातून पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न दिसून येतो. दुसरीकडे मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश शाखेचे सय्यद जफर म्हणाले, काँग्रेस अशा प्रकारच्या चित्रपटाचे प्रसारण होऊ देणार नाही. काँग्रेसचे मीडिया प्रभारी नरेंद्र सलुजा म्हणाले, भाजप प्रायोजित अशा चित्रपटांवर प्रतिबंध लावणार नाही किंवा त्याद्वारे प्रचार करण्याची मुळीच इच्छा नाही.

 

बातम्या आणखी आहेत...