आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यपी मुलाला कंटाळून तिघांनी घेतल्या नदीत उड्या:पत्नी-मुलीचा मृत्यू; पती वाचला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरून आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास सवना येथील एका कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. या घटनेत पत्नी व मुलीचा बुडून मृत्यू झाला. तर कनेरगाव नाका येथील ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे सदर कुटुंब प्रमुखाला वाचवण्यात यश आले.    


विठ्ठल अमृतराव नायक (६०) असे वाचलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमा देशमुख (२४, रा. पान कनेरगाव) आणि शकुंतला विठ्ठल नायक (५०), असे मृत दोघींची नावे आहेत. हे सर्व एकाच कुटुंबातील असून, विठ्ठल व शकुंतला हे पती-पत्नी  सवना येथील रहिवासी असून त्यांची मुलगी उमा ही पानकनेरगाव येथील आहे. विठ्ठल नायक यांचा मुलगा संजय हा दारुड्या आहे. त्यामुळे पैसे आणि इतर कारणावरून नेहमीच तो आई आणि वडील यांना भांडत असे. त्यामुळे घरचे लोक त्रस्त झाले होते. त्यात या कुटुंबाने दारुड्या मुलगा-भावाच्या त्रासाला कंटाळून सामूहिक आत्महत्या करण्यासाठी पैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेतली.  घटनेची माहिती कनेरगाव नाका चौकीत दिल्यानंतर सुनील खिल्लारे, मोहन धाबे, विजय महाले, विकास राठोड आदींनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य केले. तर ही घटना वाशीम जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने वाशीम पोलिसांकडे पुढील कार्यवाही सोपवण्यात आली.    


..अन उचलले टोकाचे पाऊल:  कुटुंब प्रमुख असलेले विठ्ठल नायक देशमुख यांच्याकडे १०-१२ एकर शेती होती. सुरुवातीला त्यांना सुद्धा दारूचे थोडेसे व्यसन होते. परंतु त्यांनी सहा वर्षांपूर्वी दारू सोडून नियमित कामे सुरू केली. परंतु दारूचे व्यसन व तीन मुलींचे लग्न केल्याने विठ्ठल नायक देशमुख यांच्याकडे केवळ दीड एकर शेती उरली होती. 

बातम्या आणखी आहेत...