आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत बुद्धगयेत कालचक्र उत्सव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धगया- तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत बुद्धगयेत कालचक्र उत्सव सुरू झाला आहे. कालचक्र उत्सव बौद्ध भाविकांसाठी कुंभमेळ्यासमान असतो. ही त्यांची सर्वात मोठी पूजा मानली जाते. दलाई लामा यांच्या नेतृत्वाखाली उत्सवातील प्रार्थनेची सुरुवात केली जाते. 

 

जगभरातील बौद्ध भिक्षू व भाविक यात सहभागी हाेण्यास बुद्धगयेत येतात. कालचक्रचा अर्थ वेळेचे चक्र असा आहे. याला तिबेटी बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे. कालचक्र उत्सवात बौद्ध कर्मकांडासह प्रवचन व दीक्षा समारंभाचा समावेश असतो. दररोज धर्मगुरूकडून प्रवचन दिले जाते. तिबेटच्या केंद्रीय प्रशासनाचे अध्यक्ष लोबसंग संगय यांनी दलाई लामांसोबत सहभाग नोंदवला. 

बातम्या आणखी आहेत...