आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीची छेड काढल्याचा आरोप, एसआरपीएफच्या जवानासह दोघांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- रस्त्याने दुचाकीवर जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत अर्वाच्य भाषा वापरल्यामुळे मुलीच्या मित्राने त्याला जाब विचारला. या वेळी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्यानेच त्याच्या एसआरपीएफमध्ये जवान असलेल्या मित्राला बोलावले. त्यावेळी एसआरपीएफचा जवान व अर्वाच्य भाषेचा वापर करणाऱ्या दोघांनी मुलीसह तिच्या मित्राला मारहाण केल्याचा आरोप करून मुलीने फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. १) दुपारी घडला. 

मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. एसआरपीएफ जवान सुशील सुभाषराव देशमुख (३२, रा. स्वावलंबीनगर) आणि शशिकांत नारायण राऊत (२८) यांना अटक केल्याची माहिती फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली आहे.