आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लायसन्स' नसेल तर दुचाकी पकडून पालकांना बोलावणार, अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लायसन्सशिवाय महामार्गावर दुचाकी चालवत असाल तर खबरदार. यापुढे अशा तरुणांना पकडून घटनास्थळी पालक येईपर्यंत सोडले जाणार नाही. खुलताबाद, वेरूळ रस्त्यावर होणारे अपघात लक्षात घेता हे पाऊल उचलल्याची माहिती महामार्ग पोलिस खुलताबाद केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण यांनी दिली. 


औरंगाबाद - खुलताबाद-वेरूळ रस्त्यावर महाविद्यालयीन तरुण-तरुणी वेगाने दुचाकी चालवणे, हेल्मेट न घालणे, चालत्या गाडीवर सेल्फी घेणे, रात्री उशिरापर्यंत घाटात बसणे, मद्य प्राशन करणे असे प्रकार करतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या पाहणीत समोर आले आहे. अनेकदा पालकांना अंधारात ठेवून तरुण हे प्रकार करतात. मुले काय करतात, कोठे जातात याची माहिती पालकांना असावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या व परवाना नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई तर होईलच शिवाय घटनास्थळी पालकांना बोलावले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. महामार्ग पोलिस निरीक्षक सुरेख वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण यांचे पथक ही कारवाई करणार आहे. दुचाकी चालवताना हायवा, ऊस, सिमेंटचा ट्रक आणि जड वाहनांपासून किमान १५ फूट अंतर ठेवा. वळताना इंडिकेटरचा उपयोग करा. हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकीवर बसू नका, अशा सूचना महामार्ग पोलिसांनी दिल्या आहेत. 

 

नियम पाळा 
आपण चूक करतोय हे तरुणांच्या लक्षात येत नाही. अनेकदा पालकांना कल्पना न देता दुचाकी घेऊन ते शहराबाहेर जातात. हा निष्काळजीपणा त्यांच्या जिवावर बेतू शकतो. हे प्रकार रोखण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. - नामदेव चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक 

बातम्या आणखी आहेत...