आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधकांचा आरोप : तीन तलाकला गुन्हा ठरवण्यामागचा खरा उद्देश मुस्लिम पुरुषांना शिक्षा देणे हाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एकाच वेळी तीन तलाकला गुन्हा ठरवणारे विधेयक गुरुवारी लाेकसभेत मंजूर झाले. २४५ खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने, तर ११ सदस्यांनी विराेधात मतदान केले. त्याआधी या विधेयकावर लोकसभेत चांगलीच खडाजंगी चर्चा झाली. विरोधकांनी सरकारवर आरोप केले. काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव म्हणाल्या, विधेयकाचा खरा उद्देश मुस्लिम महिलांचे सबलीकरण नव्हे तर मुस्लिम पुरुषांना शिक्षा देणे हा आहे. त्यावर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हा मुद्दा काेणत्याही धर्माशी नव्हे, तर न्यायाशी संबंधित असल्याचे सांगितले. जानेवारी २०१७ नंतर तीन तलाकविषयीचे ४७७ खटले समाेर अाले अाहेत. संसद १२ वर्षांपेक्षा लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याचे विधेयक मंजूर करू शकते; मग हे विधेयक का नाही. त्यामुळे मुस्लिम महिला (विवाहात अधिकारांचे रक्षण) विधेयक अाता राज्यसभेत ठेवण्यात येईल. २८ डिसेंबर २०१७ राेजीही संसदेने ते मंजूर केले हाेते; परंतु विराेधी पक्षांमुळे ते राज्यसभेत अडकले. विराेधकांच्या सूचनेवरून सरकारने या विधेयकातील जामिनाच्या तरतुदीसह इतर काही दुरुस्त्या केल्या.

 

विरोधी पक्षांचे आरोप-
अन्वर राजा ( अद्रमुक) : एक समाज विधेयकाच्या निशाण्यावर अाहे. पती तुरुंगात गेल्यास महिलेची देखभाल काेण करेल?


सुदीप बंडाेपाध्याय (टीएमसी) : विधेयकातील बहुतांश मुद्द्यांशी सहमत अाहाेत; परंतु गुन्ह्याच्या मुद्द्यावर शंका अाहेत. विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठवले जावे.


अाेवेसी : सबरीमालावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयास विराेध धार्मिक भावना ठरू शकते; मग मुस्लिमांच्या सामाजिक प्रकरणात त्यांची भावना का असू शकत नाही? त्यामुळे मुस्लिमांना कारागृहात पाठवणे, हाच या विधेयकाचा उद्देश अाहे.

 

सत्ताधारी पक्ष  
नक्वी : तीन तलाक इस्लामचे अंग नाही. सती प्रथेप्रमाणे तीही एक सामाजिक कुप्रथा अाहे. जर काही लाेक शिक्षेला भीत असतील तर मग गुन्हे करताच कशाला?  

 

स्मृती इराणी : हुंडा देणे-घेणे हे दाेन्ही पक्षांच्या संमतीने हाेत असल्याचे यापूर्वी सांगितले जायचे. नंतर हा प्रकार गुन्हा ठरवण्यात अाला. सती प्रथेविराेधातही कायदा करावा लागला.  


मीनाक्षी लेखी : तीन तलाक मानवी हक्कांचे उल्लंघन अाहे. हे विधेयक समान अधिकार मजबूत करणारे अाहे.

 

विराेधी पक्षांच्या १३ दुरुस्त्याही फेटाळल्या
असदुद्दीन अाेवेसी, अारएसपीचे एन.के.प्रेमचंद्रन व बिजू जनता दलाचे भर्तृहरी मेहताब यांनी तीन तलाक विधेयकात १३ दुरुस्त्या सुचवल्या; परंतु संसदेने सर्व नाकारल्या. यासह विराेधकांनी ११ दुरुस्त्यांवर मतविभाजनाची मागणी केली; परंतु सर्व दुरुस्त्या माेठ्या फरकाने नाकारल्या गेल्या.

 

प्रसाद म्हणाले- तीन तलाकला सर्वच वाईट म्हणतात  
कायदामंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘हे विधेयक मुस्लिम महिलांना सन्मान व बराेबरीचा हक्क देणारे अाहे. बहुतांश खासदारांची या गाेष्टीवर सहमती अाहे की, तीन तलाक वाईटच अाहे. तरीही सर्वच जण विचारत अाहेत की विधेयक का अाणले? हे काही लक्षात येत नाही.

बातम्या आणखी आहेत...