आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेमध्ये कनिष्ठ सभागृहाच्या सभापतिपदी ट्रम्पविरोधी खासदार पॅलोसी, सदस्यांनी घेतली पवित्र कुराणची शपथ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कट्टर विरोधक तथा डेमोक्रॅटिक पार्टीच्या खासदार नॅन्सी पॅलोसी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अर्थात कनिष्ठ सभागृहाच्या सभापती झाल्या आहेत. यापूर्वी २००७ ते २०११ पर्यंत त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यावरून निधीच्या मागणीवरून सध्या शटडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर पॅलोसी यांचा विजय झाला आहे. ट्रम्प मेक्सिको सीमेवरील भिंतीच्या योजनेत अडचणीत आले आहेत. या प्रकल्पाला पॅलोसी यांनी तीव्र विरोध केल्यामुळे त्याची तीव्रता आणखी वाढली होती. अमेरिकेत गतवर्षीच्या अखेरीस पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत विरोधी पक्ष डेमोक्रॅटिकला बहुमत मिळाले. नॅन्सी आपल्या निवडीवर म्हणाल्या, महिलांना मतदानाचा हक्क मिळाल्याचे हे अमेरिकेतील १०० वे वर्ष आहे. पहिल्यांदाच सभागृहात १०० हून जास्त महिला निवडून आल्या. ही अभिमानाची बाब आहे. 


नॅन्सी पॅलोसी अमेरिकेतील सर्वात बलाढ्य महिला 
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्षांनंतर सर्वात मोठे तिसरे पद म्हणून सभापती पद मानले जाते. सध्या पहिल्या दोन पदांवर पुरुष विराजमान आहेत. त्या दृष्टीने नॅन्सी या अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली महिला बनल्या आहेत. त्या विरोधी पक्षाच्या नेत्याही आहेत.
 
इल्हान : कुराणची शपथ घेणारी पहिली महिला खासदार 
मध्यावधी निवडणुकीत पहिल्यांदाच दोन मुस्लिम उमेदवार इल्हान उमर व राशिदा तालिबने विजय संपादन केला. दोघीही डेमोक्रॅटिक पार्टीच्या तिकिटावर निवडणुकीत विजयी झाल्या. इल्हानने हिजाब परिधान करून कुराणची शपथ घेतली. अमेरिकेतील हा ऐतिहासिक क्षण ठरला.
 
सभापतिपदामुळे काय होईल परिणाम ? 
आणीबाणीच्या परिस्थितीत उपराष्ट्राध्यक्षांनतर सभापती होऊ शकतात राष्ट्राध्यक्ष 
अमेरिकेच्या राज्य घटनेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत उपराष्ट्राध्यक्षांनंतर सभापती राष्ट्राध्यक्षांची जागा घेऊ शकतात. लोकप्रतिनिधी सभागृहात बहुमत असलेला पक्ष विषयपत्रिकेवर नियंत्रण ठेवू शकतो. बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पार्टीला त्यामुळे चर्चेचे नियम निश्चित करण्याचेही अधिकार मिळू शकतात. ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याचा पॅलाेसी यांच्यावर पक्षातून दबाव आहे. परंतु राजकीय कारणामुळे महाभियोग आणू नये, असे त्यांना वाटते. मध्यावधी निवडणुकीत त्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या रणनीतिकारही राहिल्या. यापूर्वी ओबामा यांच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनेलाही पाठिंबा दिला होता. 

 

निर्वासित छावणीतून २३ वर्षांपूर्वी इल्हानचे आगमन 
इल्हान डेमोक्रॅट्स पार्टीच्या तिकिटावर मिनेसोटामधून खासदार झाल्या. शपथविधीपूर्वी इल्हानने ट्विट करून भावना मांडल्या. २३ वर्षांपूर्वी केनियातून निर्वासित छावणीतून वडीलांसोबत वॉशिंग्टन डीसीच्या विमानतळावर पोहोचले होते. सोमालीची खासदार म्हणून शपथ घेताना त्याच विमानतळावर वडिलांसोबत आले.