आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प-किम जाेंग उन दुसरी बैठक; भेटीसाठी जागेचा शोध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे शासक किम जाेंग उन यांच्यात दुसरी बैठक होणार आहे. परंतु त्यासाठी योग्य जागेचा शाेध घेतला जात आहे. तो अद्याप पूर्ण झालेला नाही. 

 

अमेरिकेच्या माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. ते म्हणाले, ट्रम्प व उन यांच्या भेटीसाठी लवकरच ठिकाण ठरवले जाईल. तूर्त तरी स्वित्झर्लंडमध्ये बैठक होणार नाही. दक्षिण कोरियाचे वरिष्ठ नेत्याने गुरुवारी बैठकीसाठी योग्य ठिकाण शोधण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले. ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरअखेरीस आशियासह इतर देशांत आपल्या पथकांना योग्य ठिकाण शोधण्यासाठी पाठवले होते, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर उभय नेत्यांतील बैठक स्वित्झर्लंडमध्ये आयोजित होणार होती. परंतु वाहतुकीतील अडचणी लक्षात घेऊन ही शक्यता अमेरिकेने नाकारली होती. 

 

नवीन वर्षातील भाषणातून नाराजी 
नूतन वर्षाच्या भाषणातून किम जाँग उन यांनी अमेरिकेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, ट्रम्प यांच्याशी आणखी एक बैठक घेण्याची इच्छा उन यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या प्रमुखांना भेटण्याचे संकेत दिले होते.