आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - दाेन दिवसांचा अयाेध्या दाैरा यशस्वी करून रविवारी मुंबईत परतलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसैनिकांनी ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले.
उद्धव यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उभे होते.
उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. तेथे उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केले. उद्धव यांचा अयाेध्या दौरा निर्विघ्नपणे पार पडला. दौऱ्याला अपेक्षेपेक्षा मोठी प्रसिद्धी मिळाली. तसेच भाजपला डॅमेज करण्यात शिवसेना यशस्वीही ठरली, त्यामुळे शिवसेनेचा गड असलेल्या मुंबईतील शिवसैनिकांमध्ये चैतन्याची लाट पसरली असल्याचे दिसून अाले.
अजित पवारांची टीका
शिवसेना आणि भाजप एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. मात्र आगामी निवडणुकांत त्यांना युती करायची आहे. मात्र लोक प्रश्न विचारतील या भीतीने त्यांना ग्रासले आहे. लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा त्यांना प्रश्न त्यांना सतावतो आहे. म्हणून श्रीरामाचा मुद्दा पुढे करत त्यांना पुन्हा युती करायची आहे. म्हणूनच अयोध्या यात्रा काढली, अशी टीका अजित पवार यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.