आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय कुरघोडीत उजनी धरणाच्या पाण्याचा विषय पडला मागे; मुख्यमंत्री या विषयावर न बोलताच लातुरातून गेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर शहराच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या उजनी धरणातून जलवाहिनी अंथरण्याच्या योजनेचा विषय पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीच हाणून पाडला. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी लातूरला उजनीचे पाणी दिले तर पुन्हा लातूरकर कधीच काही मागणार नाहीत, असा उल्लेख केला होता. मात्र पवारांवर कुरघोडी करीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून एवढी कामे झाली आहेत की लातूरला उजनीच्या पाण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयाला हातच घातला नाही. 

लातूर शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला. मात्र सातत्याने पर्जन्यछायेच्या कक्षात असलेल्या या धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस पडत नाही. एखाद्या वर्षी पाऊस पडला की पुढची दोन-तीन वर्षे कोरडी जातात, असा अनुभव आहे. सलग चार वर्षे मांजरा धरणात पाऊस न पडल्यामुळे २०१६ मध्ये म्हणजेच दोन वर्षांपूर्वी लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. शहराला पर्यायी पाणीपुरवठा करण्यासाठीची सोय नसल्यामुळे केवळ आणि केवळ या एकमेव स्रोतावरच अवलंबून राहावे लागते. दोन वर्षांपूर्वीच्या भीषण दुष्काळानंतरची दोन वर्षे चांगल्या पावसाची गेली. मात्र यावर्षी पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली आहे. मांजरा धरणात यावर्षी एका थेंबाचीही आवक झालेली नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा मृत साठ्यावर पोहोचला. आता पुढच्या काळात पाऊस पडला नाही तर यावरच लातूर, कळंब, अंबाजोगाई, धारूर, केज या शहरांना आपली तहान भागवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर लातूरसह या परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे उजनी धरणातून पाणी आणून ते मांजरा धरणात टाकण्याची योजना मंजूर करण्याची मागणी केली होती. दोन वर्षांपूर्वी त्यावर चर्चाही झाली. परंतु पुढे चांगला पाऊस पडला आणि हा विषय मागे पडला. 


निलंगेकरांनी केली पवारांवर कुरघोडी 
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा विषय उचलून धरला. लातूरला एक वेळ उजनीचे पाणी आणून द्या, असे पवार म्हणाले. मात्र पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हा मुद्दा उचलून धरतील असे वाटत असतानाच त्यांनी लातूरला उजनीच्या पाण्याची गरज नाही. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे भूजल पातळी वाढली आहे, असे ठासून सांगिल्याने मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दाच बाजूला ठेवला. 

बातम्या आणखी आहेत...