आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- केंद्र शासनाने घोषित केलेल्या उज्ज्वला गॅस जोडणी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ५३४ कुटुंबांना गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील ९२ टक्के कुटुंबाकडे गॅस कनेक्शन उपलब्ध आहे, अशी माहिती भारत गॅसचे वरिष्ठ व्यवस्थापक राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये भारत पेट्रोलियमकडून ६६ हजार ६४१ हिंदुस्तान पेट्रोलियमकडून ३४ हजार ८८८ आणि इंडियन ऑइलकडून १० हजार ५ कनेक्शन देण्यात आले आहे. भारत सरकारच्या पेट्रोेलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आखली.
या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये मार्च २०१९ अखेर दारिद्य्र रेषेखालील ५ कोटी महिलांना गॅस कनेक्शन देण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. मंत्रालयाने ठरवलेले ५ कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ऑगस्ट २०१८ मध्येच पूर्ण झाले आहे. १ मे २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा उत्तर प्रदेशातील बालिया येथे शुभारंभ करण्यात आला होता. ही योजना सुरू करण्यापूर्वी संपूर्ण देशभरात ६२ टक्के पेक्षाही कमी कुटुंबांकडे गॅस कनेक्शन होते. परंतु आता ही योजना सुरू झाल्यानंतर १ डिसेंबर २०१८ अखेर ८९ .५ टक्के कुटुंबाकडे गॅस कनेक्शन उपलब्ध आहे
अशी आहे योजना
चूल, भुशाची शेगडी आणि अन्य साहित्याचा वापर करून प्रचंड हालाखीत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना मुक्ती मिळावी म्हणून केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीमधील कुटुंबे, पंतप्रधान आवास (ग्रामीण) योजनेचे लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, जंगलातील रहिवासी, अतिमागासवर्गीय कुटुंबे, चहाच्या मळ्यातील आदिवासी, नद्यांच्या बेटावरील रहिवासी आणि आता नव्यानेच या यादीत ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा गरीब कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.