आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्या- विश्व हिंदू परिषदेने रविवारी आयोजित केलेल्या धर्मसभेत उपस्थित साधू-संतांसह इतर लोकांनी अयोध्येतील माती हाती घेऊन रामजन्मभूमीवरच मंदिर उभारण्याचा संकल्प केला. विहिंपचे उपाध्यक्ष चंपत राय म्हणाले, 'जन्मभूमीची वाटणी आम्हाला मान्यच नाही. मुस्लिम समाजाने सर्वोच्च न्यायालयातील खटला मागे घ्यावा. मंदिराचा हा लढा ५०० वर्षांपासून सुरू आहे. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.'
इतर मंदिरे मुक्तीसाठी मोहीम उघडू : विहिंपच्या धर्मसभेचे अध्यक्ष स्वामी परमानंद यांनीही इशारा दिला. मुस्लिम समाजाने अयोध्येतील राम जन्मभूमीवरील दावा आता सोडला नाही तर काशी-मथुरेसह देशभरातील ४० हजार मंदिरे मुक्त करण्यासाठी मोहीम छेडली जाईल, असे ते म्हणाले.अयोध्येत २२१ मीटर उंचीची श्रीरामाची मूर्ती : शरयू नदीच्या तीरावर श्रीरामाच्या मूर्तीची उंची उ. प्र. सरकारने वाढवून गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीपेक्षा उंच म्हणजे २२१ मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.