आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

97 टक्के वसुलीचे मोठे अाव्हान; वसूल झाले एक काेटी दोन लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - गत अार्थिक वर्षात ग्राम पंचायत प्रादेशिक पाणी पट्टी वसुली केवळ ६.२ टक्के झाल्यानंतरही यंदाही वसुलीसाठी जि.प. प्रशासनाने कोणताही धडा घेत नसल्याचे अातापर्यंत वसूल झालेल्या रकमेवर नजर टाकल्यास दिसून येते. सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ १ काेटी २ लाख ९१ हजार वसूल झाले असून, एकूण थकबाकीची रक्कम २८ काेटी ५० लाखांपर्यंत पाेहाेचली अाहे. दरवर्षीच अत्यल्प वसुली हाेत असल्याने पाणी पुरवठा योजनेच्या देखभालीसाठीचा खर्च प्रशासनाला स्व उत्पन्नातून करावा लागताे. परिणामी लाभार्थ्यांच्या हिताच्या योजनांना कात्री लावावी लागते. प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार लाभार्थ्यांना मुळावर उठल्याचा अाराेप हाेत अाहे. 

 

अनेकदा कर थकल्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून हाेणारा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येताे. कर वसुली आणि इतरही प्रशासकीय कामकाजासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे अधिकारी अनेकदा विविध सभांमध्ये सांगतात. मात्र रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे अपेक्षित पाठ पुरावाच करण्यात येत नसल्याचा अाराेप विराेधकांमधून हाेताे. या सर्वांचा परिणाम कर वसुलीवर हाेत अाहे. दरम्यान थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढतच असल्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची देखभाल करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देखभालीसाठी जिल्हा परिषदेला स्व उत्पन्नातून द्यावे लागणार अाहे. वसुलीबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीराम कुळकर्णी यांना मोबाइल फाेनवर संपर्क साधला असता त्यांना फाेन उचलला नाही. 

 

जिल्ह्यात अशी अाहे पाणी पट्टीची थकबाकी 
ग्राम पंचायत प्रादेशिक पाणी पट्टी वसुली सप्टेंबर अखेर २०१८ अखेरपर्यंत केवळ ३.४८ टक्केच झाली अाहे. समितीनिहाय थकबाकी पुढीलप्रमाणे अाहे. 

 

पंचायत समिती थकबाकी टक्केवारी 
अकाेला २९ काेटी २४ लाख ४४ हजार ४६२ ३.९० 
अकाेट ६ काेटी १ लाख ३९ हजार ५७१ २.६० 
बाळापूर ९० लाख ६ हजार २७३ ०० 
तेल्हारा ३४ लाख १८ हजार ०२२ ०.५४ 
एकूण २८ काेटी ५० लाख ८ हजार ३२८ ३.४८ 

 

घराप्रमाणे पाणी पट्टी वसुली का हाेत नाही? 
ग्राम पंचायत घर कर वसुली अार्थिक वर्षात ८६.३४ टक्के झाली हाेती. याचप्रमाणे पाणी पट्टीची वसुली का हाेत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत अाहे. अकाेला पंचायत समितीने ८४. ८७ टक्के, अकाेट-८०.४६, बाळापूर-८८.५० टक्के, बार्शीटाकळी-९०.९७, मूर्तिजापूर-८६.७५, पातूर-८३.२४ आणि तेल्हारा पंचायत समितीअंतर्गत घर कर वसुली ९०.०३ टक्के झाली हाेती. 

 

असा झाला अर्थसंकल्पावर परिणाम 
जिल्हा परिषदेचे २०१७-१८चे सुधारित अंदाजपत्रक ४९ काेटी ९५ लाख ९३ हजार ३०० रुपयांवर पाेहाेचले हाेते. गतवर्षीच्या तुलनेने यंदाचा अर्थात २०१८-१९चा अर्थसंकल्प ४ काेटी ८० लाख रुपये कमीचा हाेता. त्यामुळे २०१८-१९च्या मूळ अंदाजपत्रक, गत वर्षीच्या सुधारित अंदाजपत्रकात फरक अाहे. याचेच प्रतिबिंब कमीच्या अर्थसंकल्पावर दिसले. प्रादेशिक पाणी पट्टी वसुली थकल्याने याचा फटका योजनांना बसणार अाहे. 

 

कारवाई काही हाेईना 
गत अार्थिक वर्षात ग्राम पंचायत प्रादेशिक पाणी पट्टी वसुली केवळ ६.२ टक्के झाल्याने संबंधित ५६ सरपंच आणि ३८ ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात अाल्या हाेत्या. मात्र संबंधितांनी काेणताच खुलासा केला नाही. त्यामुळे त्यांना अंतिम नाेटीस बजावण्यात अाली हाेती. त्यानंतर त्यांच्यावर काेणती कारवाई झाली, हे अद्याप गुलदस्त्यात अाहे. 

 

अधिकाऱ्यांना काेणाचे अभय ? 
८४ खेडी नळ योजनेसह पाणी कर वसुलीची चर्चा गतवर्षी नाेव्हेंबर मधील विशेष सभेत केली हाेती. वसुलीबाबत पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली हाेती. त्यामुळे वसुलीची जबाबदारी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णींवर साेपवण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र तरीही वसुलीबाबत अानंदच अाहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून वसुलीचे काम करुन घेण्यात अपयशी अधिकाऱ्यांवर काेणती कारवाई हे पाहणे अाैत्सुक्याचे राहणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...