आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना- लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवण्यात येतो. यासाठी 'छोटे कुटुंब' या संकल्पनेतून कुटुंब नियोजन हा सुखी, समाधानी कौटुंबिक जीवनाचा आधारस्तंभ आहे. यामुळे लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवल्या जातात. जिल्ह्यातील ९५८ गावांमधून कुटुंब कल्याणासाठी स्त्रियांसह पुरुषांचा देखील सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आजही महिलांचेच प्रमाण जास्त आहे. दरम्यान, तीन वर्षांच्या काळात ८० केंद्रांच्या माध्यमातून ६८ हजार ५७२ स्त्रियांनी शस्त्रक्रियेसह लूप बसवून कुटुंब नियोजनासाठी पुढाकार घेतला असून यात ७२६ पुरुषांनी नसबंदी केली आहे. यामुळे वाढत्या लोकसंख्येवर काही प्रमाणात का होईना आळा बसू लागला आहे.
जगातील लोकसंख्येमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. देशाची लोकसंख्या आता १३३ कोटीपर्यंत गेली आहे. कुटुंब कल्याणसाठीही महिलांनाच पुढाकार घ्यावा लागत आहे. अपत्य प्राप्तीपासून ते गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा कालावधी अन् पुढे बाळंतपणाच्या वेदना महिलेला सोसाव्या लागतात.
त्यानंतर किमान कुटुंब कल्याणासाठी पुरुषांनी पुढाकार घेणे गरजेचे असताना केवळ महिलांनाच पुढे यावे लागत आहे. कुटुंब कल्याण योजनेत पुरुषांचे सहभागी न होण्याचे कारण म्हणजे नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल असलेले गैरसमज आहेत. यामुळे जिल्हा पातळीवरील आरोग्य विभाग, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लाभार्थींना द्यावयाच्या सेवांमध्ये कायमच्या पद्धती व तात्पुरती पद्धती असे दोन प्रकार आहेत.
कायमच्या पद्धतीमध्ये पुरुष शस्त्रक्रिया व स्त्री शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. स्त्री शस्त्रक्रियांमध्ये टाक्याच्या व बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तात्पुरत्या पद्धतीमध्ये तांबी, गर्भनिरोधक गोळ्या, निरोध यांचा वापर केला जातो. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत आरोग्य केंद्रे, कुटुंब कल्याण केंद्रे, सहायक परिचारिका यांच्या मार्फत कुटुंब कल्याणासाठी ही योजना राबवल्या जाते.
जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार कुटुंब
जालना जिल्ह्यातील ९५८ गावांमधून ३ लाख ९१ हजार ७०१ कुटुंब कार्यरत असल्याची २०११ जनजणनेनुसार नोंद आहे. यात ७० हजार ७९३ कुटुंब हे शहरी तर ३ लाख २० हजार ९०८ कुटुंब हे ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत.
कुटुंब लहान सुख महान- ३ लाख २० हजार ९०८ कुटुंब ग्रामीण भागात वास्तव्यास, गत वर्षात ३२ हजार २०७ जन्म तर २ हजार २८९ मृत्यूची झाली नोंद.
वर्षनिहाय नसबंदी/लूप
वर्ष महिला पुरुष
२०१७ १५५२० ११८
२०१६ २६०५१ ३९२
२०१८ २७००१ २१६
एकूण ६८५७२ ७२६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.