आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा :मेेरी कोम सातव्यांदा पदकाच्या फेरीत; आज उपांत्य लढत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एमसी मेरी कोम महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत गुरुवारी उपांत्य लढतीसाठी मैदानात उतरणार आहे. मेरी कोम सातव्यांदा स्पर्धेतील पदकाच्या लढतीत पोहोचली. यापूर्वी ती सहा वेळा पदकाच्या लढतीत पोहोचली. प्रत्येकी वेळी अव्वल दोनमध्ये राहिली.   
मेरी कोमने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत पाच सुवर्ण आणि एका रौप्यपदक जिंकले. स्पर्धेत भारताचे चार खेळाडू अंतिम चारमध्ये पोहोचले आहेत. मेरी कोमचा उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम यहांगशी सामना होईल. ३५ वर्षीय मेरी कोमने अखेरच्या वेळी २०१० मध्ये सुवर्ण जिंकले होते.

 

मेरी कोम क्युबाच्या फेलिक्स सेवोनच्या ६ सुवर्णाच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी प्रयत्न करेल. पुरुष आणि महिला गटातील सेवोन सहा पदके जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. मेरी कोमने स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांत ५-० ने सहज विजय मिळवला आहे. ती दिल्लीत आपल्या २००६ च्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करू इच्छित आहे. 

 

लवलिना म्युथाईने केली करिअरची सुरुवात   

पहिल्यांदा विश्वचषक चॅम्पियनशिपमध्ये खेळणारी लवलिना ६९ किलो गटात गुरुवारी उपांत्य लढतीत तैवानच्या चेन चिनशी सामना करेल. तिने २०१२ मध्ये बॉक्सिंगला सुरुवात केली. यापूर्वी ती म्युथाई हा खेळ खेळत होती. २०१२ मध्ये सबज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत उतरली. तेथे सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिची साईसाठी निवड झाली.

 

आसामच्या लवलिनाने म्हटले की, राष्ट्रकुलच्या स्पर्धेत थोड्याशा फरकाने ती पराभूत झाली होती. त्यानंतर स्वत:चा व्हिडिओ पाहून चुका दुरुस्त केल्या. जर मी येथे पदक जिंकू शकले नाही, तर खूप निराश होईन. स्पर्धेच्या तयारीसाठी एक वर्षापासून घरी गेले नाही. आता मी घरी जाऊ इच्छिते. ऑलिम्पिकपूर्वी सर्व मोठ्या खेळाडूंना पराभूत करत सुवर्ण जिंकण्याची तिची इच्छा आहे. २०२० ऑलिम्पिक मानसिकदृष्ट्या माझ्यासाठी फायदेशीर राहील. ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या सामन्यांना पुढील वर्षी सुरुवात होईल.

बातम्या आणखी आहेत...