आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या निधनाच्या दु:खातून सावरून संघात मिळवले स्थान; स्पर्धेत जिंकले पहिले पदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांच्या जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत साेनियाला राैप्यपदक; सिमरन, लवलीनाला कांस्य   
सोनियाने नुकत्याच घरच्या मैदानावर झालेल्या महिलांच्या जागतिक बाॅक्सिंंग स्पर्धेतील अापल्या वजन गटात राैप्यपदकाची कमाई केली.  या २१ वर्षीय खेळाडूने पहिल्यांदाच या जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला हाेता. या पहिल्याच संधीचे साेने करताना तिने पदकाचा बहुमान पटकावला. याशिवाय तिने यजमान भारताला पदक मिळवून देण्यात माेलाचे याेगदान दिले.   


 साेनिया ही अाॅक्टाेबर महिन्यात या स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीसाठी दिल्ली येथे अाली हाेती. 
याचदरम्यान घरी तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मात्र, असे झाल्यानंतरही तिला याबाबतची माहिती देण्यात अाली नाही. दरम्यान, प्रचंड मेहनतीच्या बळावर साेनियाने भारतीय संघातील अापला प्रवेश निश्चित केला.  ही निवड झाल्याची अानंदाची बातमी देण्यासाठी तिने वडिलांना फाेन केला. मात्र, त्या वेळी त्यांचे निधन झाल्याचे तिला कळाले तरीही तिने दु:खाला न कवटाळता स्वत:ला सावरले अाणि जागतिक स्पर्धेत पदक जिंकले. 

 

पंजाबच्या सिमनरजितच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी झाले हाेते निधन

पंजाबची प्रतिभावंत बाॅक्सर सिमरनजितही जागतिक स्पर्धेत चमकली. तिने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत सहभागी हाेण्यापूर्वी तिच्या डाेक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले. तिच्या वडिलांचे अचानक निधन झाले. यादरम्यान ती भारतीय संघाच्या प्रशिक्षण अाणि सराव शिबिरात सहभागी हाेती. तिला नंतर याची माहिती मिळाली. दरम्यान, अाईने तिला धीर दिला अाणि तिने याच्या बळावर वडिलांचे देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न साकारले.

 

यूट्यूबवरून गिरवले बाॅक्सिंगचे धडे; जिंकले पदके कांस्पपदक

अासामाच्या  लवलीनाने २०१२ मध्ये बाॅक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिने कसून मेहनत घेतली अाणि २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या सबज्युनियर बाॅक्सिंग स्पर्धेत सहभाग नाेंदवला. या ठिकाणी तिला कांस्यपदकाची कमाई करता अाली.  तिने मुअा थाई साेडून बाॅक्सिंगची निवड केली. तिने यासाठी यूट्यूबवर बाॅक्सिंगच्या प्रशिक्षणाचे बारकावे शाेधले अाणि त्यावर प्रचंड मेहनत घेतली. यातूनच तिला जागतिक स्पर्धेत पदक जिंकता अाले.

बातम्या आणखी आहेत...