आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला विश्वचषक टी-20: आयर्लंड-भारत पहिल्यांदा खेळणार; जिंकल्यास 8 वर्षांनी उपांत्य फेरीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गयाना - महिला विश्वचषक टी-२० मध्ये सलग दोन विजय मिळवणारी भारतीय टीम गुरुवारी आयर्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय टीमचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल. असेे झाल्यास भारत आठ वर्षांनी या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये पोहोचेल. भारताने २००९ आणि २०१० मध्ये अंतिम चार जणांत स्थान मिळवले होते. २०१२, २०१४ आणि २०१६ मध्ये संघ पहिल्याच फेरीतून बाहेर झाला होता.  


भारत टीम आपल्या १२ वर्षांच्या टी-२० इतिहासात पहिल्यांदा आयर्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे. भारताने न्यूझीलंड आणि पाकिस्तानला पराभूत करत दोन सामन्यांत ४ गुण मिळवत आपल्या ब गटात दुसरे स्थान राखले. अ गटातील अद्याप स्थिती निश्चित नाही. इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका या तिघांकडे अंतिम ४ जणांत स्थान मिळवण्याची संधी आहे. आयर्लंडविरुद्ध कौर कंपनीला जबरदस्त प्रदर्शन करावे लागेल. कारण त्याच्याकडे किम गार्थ, क्लेयर शिलिंग्टन आणि लॉरा डेलानीसारखे चांगले खेळाडू आहेत. 

 

न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा पोहोचला उपांत्य फेरीत

एलिसा हिलीची (५३ धावा) अर्धशतकी खेळी, मेगन शटच्या (१२/३) शानदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ३३ धावांनी पराभूत केले. हा ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय ठरला. त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला. ऑस्ट्रेलियन टीमने सलग सहाव्यांदा महिला विश्वचषक टी-२० च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाने ७ बाद १५३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १७.३ षटकांत १२० धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडला सामन्यात षटके टाकण्यास जास्त वेळ घेतल्याने सामना निधीवर १० टक्के दंड आणि कर्णधार सॅथरवेटवर २० टक्के दंड लावण्यात आला.  

 

 

पाकिस्तानने आयर्लंडला नमवले; आता दुसऱ्या संघावर पुढील वाटचाल   

कर्णधार जवेरिया खानच्या (७४ नाबाद) अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने आयर्लंडवर ३८ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने ६ बाद १३९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात आयर्लंड संघ ९ बाद १०१ धावा करू शकला. आयर्लंडकडून क्लेयर शिलिंग्टन (२७) व इसोबेल जाएस (३०) याच दुहेरी धावसंख्या गाठू शकल्या. पाकिस्तानसाठी सना मीर, एमन अन्वर, नशरा संधू व आलिया रियाझ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पाकिस्तानचा ३ सामन्यांतील हा पहिला विजय ठरला. जर भारतीय टीमने आयर्लंडच्या टीमचा पराभव केला तर पाकिस्तानचे उपांत्य फेरीत प्रवेशाचे स्वप्न भंग होईल.

बातम्या आणखी आहेत...