आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील अव्वल ज्युनियर बॉक्सर रजनीने राष्ट्रीय जेतेपद मिळवताच वडिलांच्या सन्मानार्थ गाठला दुधाचा ठेला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानिपत/ नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये तीन मुलींचा उल्लेख केला. या तिघींच्या यशामुळे आपल्याला ऊर्जा मिळत असल्याचे सांगून परिस्थिती कितीही वाईट असली तरी जिद्द नेहमीच यश देते, हे यातून सिद्ध होते, असे मोदी म्हणाले. पानिपतची रजनी, द. काश्मीरची हनाया आणि पुण्यातील वेदांगी या त्या तिघी आहेत. 

आईसोबत मजुरी करणाऱ्या १६ वर्षांच्या रजनीने सर्बियामध्ये बॉक्सिंग स्पर्धेत गेल्या जानेवारीत रशियाच्या प्रतिस्पर्धी मुलीस हरवले होते. जगातील अव्वल बॉक्सर म्हणून तिची निवड झाली. १९ डिसेंबरला ती राष्ट्रीय विजेती ठरली. चंदिगडमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर ती अगोदर थेट एका छोट्या ठेल्यावर दूध पिण्यासाठी गेली. दूध घेतल्यानंतर तिने चषक कपड्यात गुंडाळून ठेवला... मोदींनी रविवारी मन की बातमध्ये हा उल्लेख केला. यानंतर रजनीने 'भास्कर'शी बोलताना सांगितले, माझे वडीलही ठेला लावून लस्सी विकतात. चषक जिंकल्यावर त्यांच्या सन्मानार्थ मी या दुकानदाराकडे गेले. पानिपतच्या बुआना लाखू गावातील रहिवासी असलेल्या रजनीला चार बहिणी आहेत.

 

रजनी ८ वर्षांची होती तेव्हा गावातील बॉक्सिंगचे प्रशिक्षक सुरेंद्र मलिक यांना फुलांचे हार घातलेले तिने पाहिले. त्यांनी कोणती तरी स्पर्धा जिंकली होती. यातूनच रजनीला प्रेरणा मिळाली. आईला तिने सांगितले, 'आई, मी आता बॉक्सिंग शिकणार आहे. मग लोक माझेही असेच स्वागत करतील.' घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. तरी आईने होकार दिला. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे रजनीला आईसोबत मजुरी करावी लागली. वर रोज सहा तास ती अकादमीत सराव करत असे. अनेकदा शिळे तुकडे खाऊन ती सरावासाठी जाई. पैस नसल्यामुळे तिला जुन्या ग्लोव्हजवर सराव करावा लागत होता. आठ वर्षांच्या परिश्रमानंतर तिला कष्टाचे फळ मिळाले. 

 

कुख्यात बुरहानच्या क्षेत्रातील १२ वर्षीय हनाया अस्सल कराटेपटू : १२ वर्षीय हनाया निसार काश्मीरच्या अनंतनाग भागात कोकरनागमध्ये राहते. कुख्यात मृत दशतवादी बुरहानचे हे प्रभावक्षेत्र. हनायाने द. कोरिया कप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिने राष्ट्रीय अजिंक्यपदही मिळवले आहे. 


सायकलवर जग पादाक्रांत करणारी वेदांगी सर्वात वेगवान आशियाई : पुण्याच्या वेदांगीने गेल्या आठवड्यात सायकलने जग पादाक्रांत करून विक्रम केला. आशियातील ती सर्वात वेगवान सायकलपटू ठरली. २० वर्षीय वेदांगीने १५९ दिवसांत २९ हजार किमी प्रवास केला. म्हणजे रोज सरासरी १८२ किमी. 
 

बातम्या आणखी आहेत...