आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंटरनॅशनल डेस्क- इयान ब्रेनर टाइम मॅगझिनमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणावर एक काॅलम लिहितात. परंतु या आठवड्यात त्यांनी दिग्गज नेत्यांच्या संकल्पावर अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलेला जागतिक नेत्यांचा संकल्प.
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प :
मागील वर्षाप्रमाणे चीनशी ट्रेड वाॅर जिंकणे, ओबामा केअर बंद करणे, अमेरिकेत मुसलमानांचा प्रवेश पूर्ण थांबवणे, सीमेवर भिंत बांधणे, सुटी न घेणे, अमेरिकेस पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणे.
ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा :
मी शांत राहीन. ब्रेक्झिटवर पुन्हा एकदा जनमत घेईन.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन इमॅनुअल :
जनतेच्या इच्छेकडे लक्ष देईन. ती उपाशी असेल तर सरकार त्यांना केक देईल.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग :
मी आश्वासन देताे, जाेपर्यंत ट्रम्प माझ्या रस्त्याने येणार नाही ताेपर्यंत मी शांत राहीन. त्यानंतर मी मार्ग काढण्यासाठी पुढे जाईन.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन :
मार्चमधील युक्रेनची निवडणूक लक्षात राहील. अमेरिकेस नाराज करण्याचे नवे मार्ग शाेधेन. अमेरिकेची मजा घेणार नाही.
जर्मन चान्सलर अंगेला मर्केल :
२०२१ मधील वास्तविकतेमुळे निर्माण हाेणार आनंद लपवेन. युराेमधील सर्व समस्या साेडवण्यास मी जबाबदार राहीन.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.