आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूथ ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारताची अव्वल कामगिरी; युवांच्या प्रतिभेतून निश्चित केली टोकियो ऑलिम्पिकची पदके!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रतिभावंत युवांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने यंदाची तिसरी यूथ अाॅलिम्पिक स्पर्धा गाजवली. यातील अव्वल कामगिरीच्या अाधारे भारताने स्पर्धेत १३ पदकांची कमाई केली. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश अाहे. पहिल्यांदाच भारताला या स्पर्धेत साेनेरी यशाचा पल्ला गाठता अाला. युवांच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाला प्रथमच अाठ खेळांत ही पदकांची कमाई करता अाली. तसेच भारताने नेमबाजीसह हाॅकी अाणि ज्युदाेच्या खेळ प्रकारामध्ये पहिल्यांदा पदके जिंकली अाहेत. 

 

या अव्वल कामगिरीमुळे भारताने पदक तालिकेमध्ये १७ व्या स्थानावर धडक मारली. भारताने पहिल्यांदा टाॅप-२० मध्ये स्थान मिळवले. भारताने २०१४ च्या स्पर्धेत केवळ दाेनच पदके जिंकली हाेती. रशियाने स्पर्धेत ५९ पदके जिंकली. यामध्ये २९ सुवर्णपदकांचा समावेश अाहे. 

 

मिक्स इव्हेंटमध्ये भारत-पाकच्या नेमबाजांनी साधला नेम 
नेमबाजीच्या मिक्स इव्हेंटमध्ये भारताचा साैरभ चाैधरी अाणि पाकिस्तानच्या नुबायराने साेबतच लक्ष्य वेधले. अांतरराष्ट्रीय अाॅलिम्पिक काैन्सिलने प्रथमच देशभरात एकता नांदावी म्हणून सर्व देशांच्या खेळाडूंचा सहभाग असलेला मिक्स इव्हेंट अायाेजित केला हाेता. यातील पदकांची संघाच्या नावे नाेंद हाेत नाही. या जाेडीनेही पदकासाठी प्रयत्न केला हाेता. इतर देशांचेही खेळाडू या गटात सहभागी झाले हाेते. 

 

१५ वर्षीय जेरेमीने मिळवून दिले पहिले सुवर्णपदक 
मणिपूरच्या १५ वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनंुगाने पहिल्यांदा भारताला अापल्या इव्हेंटमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने वेटलिफ्टिंग प्रकारात हे साेनेरी यश संपादन केले. भारतीय संघ २०१० अाणि २०१४ च्या यूथ अाॅलिम्पिकमध्ये याच इव्हेंटमध्ये अपयशी ठरला हाेता. अाता हीच कसर जेेरेमीने भरून काढली. अाता जेरेमीला २०२० टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेत पदकाचा प्रबळ दावेदार मानले जाते. 

 

नेमबाजी, ज्युदाे, हाॅकीत प्रथमच पदके 
भारताच्या खेळाडूंनी यंदा ज्युदाेसह नेमबाजी अाणि हाॅकीत प्रथमच पदक पटकावले. नेमबाजीत मनू अाणि साैरभने सुवर्ण, तुषार-मेहुलीने राैप्य जिंकले. तबाबी देवीने ज्युदाेत राैप्य, हाॅकीत भारताचे महिला व पुरुष संघ राैप्यचे मानकरी ठरले. भारताने २०१० मध्ये पाच अाणि २०१४ मध्ये दाेन पदके जिंकली हाेती. 

 

माेठा बूट घालून धावला अाणि पटकावले राैप्यपदक 
भारताचा १७ वर्षीय युवा धावपटू सूरज पवारने ५ हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत राैप्यपदकाची कमाई केली. हे भारताच्या या स्पर्धेच्या इतिहासातील अॅथलेटिक्सचे तिसरे पदक ठरले. सूरजने २०१६ओयाे अाॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या मनीष रावतचे बूट घातले हाेते. या वेळी त्याच्या बुटाचा नंबर ७.५ हाेता. मात्र, सूरजला ७ नंबरचे बूट लागतात. १७० ग्रॅमच्या या अांतरराष्ट्रीय बुटाची किंमत १० हजार रुपये अाहे. डेहराडूनमध्ये राहणाऱ्या सूरजसाठी हे बूट महाग अाहेत. त्यामुळे त्याला खरेदी करता अाले नाहीत. त्यामुळे त्याने मनीषकडून हे बूट मागवले अाणि तेच बूट घालून ताे स्पर्धेत सहभागी झाला. असे असतानाही त्याने पदकाची कमाई केली, हे विशेष ठरले. 

 

चीनची अाठ वर्षांतील सुमार कामगिरी; अाता ३६ पदके 
या स्पर्धेत यंदा रशियाचे खेळाडू वरचढ ठरले. त्यांनी सर्वाधिक पदकांची कमाई करताना चीनच्या वर्चस्वाला धक्का दिला. रशियाने ५९ पदकांसह अव्वल स्थान गाठले. यामुळे चीनला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनने ३६ पदके जिंकली. ही चीनची अातापर्यंतची अाठ वर्षांतील सर्वात सुमार कामगिरी ठरली. चीनने २०१० मध्ये ३० अाणि २०१४ मध्ये ३८ पदकांची कमाई केली हाेती. मात्र, यंदा चीनचे युवा खेळाडू अपयशी ठरले. 

 

बातम्या आणखी आहेत...