आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल- पत्नीला माहेराहून परत आणण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा येथे गेलेला यावलच्या तरूणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. संतोष सुरेश भोई (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शनिवारी पत्नीला घेण्यासाठी सासरी गेला होता. परंतु पत्नीला न घेता तो रविवारी एकटाच नांदूर्याहून निघाला. परंतु दोन दिवस उलटले तरी तो घरी (यावल) पोहोचला नाही. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. पोलिसांत संतोष हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तपासादरम्यान सोमवारी सांयकाळी संतोषचा मृतदेह आढळून आला.
संतोष भोई हा रेल्वेने यावलला परतण्यासाठी निघाला होता. रविवारी यावलला सांयकाळपर्यंत पोहोचलेच अपक्षेती होते. परंतु ते पोहोचले नाही. पत्नीने सासु, सासर्यांना फोन करून संपर्क साधला असता ही बाब समोर आली. संतोषचा मोबाइलही स्वीचऑफ होता. रविवारी व सोमवार अशी दोन दिवस नातेवाईकांनी संतोषचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. रविवारी (दि.18) रोजी नांदुरा परिसरामध्ये रेल्वे अपघातामध्ये एक जण जखमी अवस्थेत आढळल्याचे समजले व त्यास खामगाव येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सर्व नातेवाईक खामगाव येथे रवाना झाले मात्र, खामगाव येथून त्यास आकोला शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. संतोषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
संतोष भोई हे हातमजुरी करत होते. संतोष भोई यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.