Home | TV Guide | News about yuvika chaudhari and prince narula

युविका-प्रिन्स लग्नाची पत्रिका नव्याने डिझाइन करून घेणार, लग्नाची चुकीची तारीख झाली होती व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 13, 2018, 12:00 AM IST

टी.व्ही.वरील जोडी युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

  • News about yuvika chaudhari and prince narula

    एन्टटेन्मेंट डेस्क: टी.व्ही.वरील जोडी युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांचेही चाहते त्यांच्या निर्णयामुळे खुश आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. या पत्रिकेनुसार दोघेही 12 आक्टोबरला लग्न करणार होते. मात्र ही पत्रिका फेक असल्याचे प्रिन्सने सांगितले होते. आता आपण 200 पत्रिका छापल्याचे आणि ही पत्रिका खरी असल्याचे त्यान सांगितले. ही पत्रिका तो आपल्या नातेवाईक आणि मित्रांना देणार आहे. मात्र आता युविकाचा विचार बदलला असून ती या पत्रिकेत बदल करण्याची मागणी करत आहे. या पत्रिकेचे डिझाइन पुनीत गुप्ताने केले होते.

    यापूर्वी पुनीतने विनोदी कलाकार भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया, टी.व्ही वरील जोडी सोएब आणि दीपिकाच्या लग्नाच्या पत्रिकेचे डिझाइन केले होते. काही दिवसांपूर्वीच पुनीत 200 पत्रिका घेऊन मुंबईला आला असल्याचे सूत्रानी सांगितले. डिझायनर पुनीत युविका आणि प्रिन्सोबत एक खास व्हिडिओदेखील शूट करणार होता. मात्र आता युविकाचा विचार बदलल्यामुळे पुनीतनेही व्हिडिओचे काम थांबवले आहे. आता दोघेही दुसऱ्या डिझायनरकडून काम करून घेणार आहेत. मात्र पुनीतने याविषयी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

    युविका आणि प्रिन्स 12 ऑक्टोबर रोजी 'सन अँड सँड' हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. तीन दिवसाआधीच विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यात मेंदी, संगीत आणि कॉकटेल पार्टी कार्यक्रम आहेत. यासोबतच प्रिन्स आणि युविकाने चंदिगडमध्ये स्वागत समारंभाचेही आयोजन केले आहे. युविकाच्या लग्नाचा गाऊन प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला डिझाइन करणार आहेत, असे सूत्राने सांगितले.

Trending