आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात सर्वदूर पावसाची हजेरी, दुष्काळाच्या तोंडावर आलेल्या पावसामुळे मिळाला दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
News and updates about Rain in Marathwada - Divya Marathi
News and updates about Rain in Marathwada

औरंगाबाद - औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळाच्या तोंडावर दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात सर्व 76 तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून दोन तालुके आणि 13 मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. 


मराठवाड्यात सरासरी 25 मिमी इतका पाऊस झाला आहे. यामध्ये उस्मानाबाद सर्वाधिक 47 मिमी तर औरंगाबाद 4.61 नालना 12 मिमी परभणी 24 हिंगोली 37 नांदेड 31बीड 21लातूर25 मिमी इतका पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक 89 मिमी तर हिमायतनगर तालुक्यात 68 मिमी पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ मंडळात 150 तर ईटकळ मंडळात 125 मिमी पाऊस झाला आहे. बुधवारी संध्याकाळपासून मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...