आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BharatBandh:पोलिसांना धक्का-बुक्की केल्याच्या आरोपात संजय निरुपम यांना घेतले ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमध्ये महामार्गावर टायर जाळण्यात आले. - Divya Marathi
गुजरातमध्ये महामार्गावर टायर जाळण्यात आले.

मुंबई - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. या बंदसाठी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. मुंबईत विविध ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्तेही बंदसाठी बाहेर पडल्याचे चित्र आहे. अंधेरीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने हे आंदोलन केले. दादरमध्ये मनसेच्या 50 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपात संजय निरुपम यांनाही ताब्यात घेण्यात आले. 


अंधेरी रेल्वे स्थानकावर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रेल्वे अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी रेल्वेमार्ग अडवून धरला. यावेळी चव्हाण यांच्याबरोबर मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, नसीम खान या नेत्यांसह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

 

MUMBAI UPDATES 
अंधेरी :
संजय निरुपम म्हणाले, मोठ्या फायद्यासाठी छोटा त्रास झाला तर काही हरकत नसते. संजय निरुपम यांनी त्वरीत पेट्रोल, डिझेल, एलपीजीचे दर कमी करण्याची मागणीही केली. यावेळी अशोक चव्हाणांसह कार्यकर्त्यांनी मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. 

 

चेंबूर - येथे  मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. याठिकाणी गाढवाला नरेंद्र मोदींचे नाव दिले. त्याला हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले मोदी हाय-हायच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच मनसेने गाढवाला पेट्रोल पंपावर नेत प्रतिकात्मक आंदोलनही केले. 

 

दादर - सेनाभवन परिसरात मनसेच्या वतीने अच्छे दिनची प्रेतयात्रा काढण्यात आली. लोकांचे डोळे उघडत नाहीत तोपर्यंत ही प्रेतयात्रा काढणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. दादर येथे मनसेच्या 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

 

परेल - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतमाना जंक्शन नाका परिसरात स्वतः रस्त्यावर उतरत बळजबरीने लोकांची दुकाने बंद केली. 

 

गोवंडी - येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याठिकाणी रेल्वे वाहतूक अडवण्यात आली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...