आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमध्ये अमित शहांची सभा, तृणमूल काँग्रेसने केले NRC च्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - भाजपाध्यक्ष अमित शहांनी शनिवारी कोलकात्यात भाजयुमोच्या सभेला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, जनतेने सभेला येऊ नये म्हणून भाजप बांग्ला विरोधी असल्याचे पोस्टर लावले. भाजपा बांगला विरोधी नाही मात्र ममता विरोधी नक्कीच आहे. तृणमूल सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी भाजप बंगालच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत जाईल. एनआरसी रजिस्टरबाबत शहा म्हणाले, राहुल गांधी आणि ममतांनी कितीही विरोध केला त्यांनी अडवल्याने नॅशनल रजिस्टर थांबणार नाही. 

 

बंगालचे सपूत श्यामा प्रसाद भाजपचे संस्थापक

शहा म्हणाले आमच्या पक्षाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी आहेत. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद  आमच्या मनात आहेत. आम्ही बांगला विरोधी नाही. एनआरसी ही घुसखोरांना निवडून काढण्याची प्रक्रिया आहे. बंगालमध्ये हे घुसखोर बॉम्बस्फोट करतात. ज्या धरतीवर रामकृष्णांचे भजन, चैतन्य महाप्रभू यांची वाणी ऐकू यायची तेथे आता स्फोटाचे आवाज ऐकू येतात. पश्चिम बंगालमध्ये संस्कृती परत आणण्यासाठी येथे भाजपची सत्ता येणार आहे. 

 

आधी देश मग वोट बँक

शहा म्हणाले आपण भाजप कार्यकर्ते आहोत. आपल्यासाठी आधी देश आणि नंतर बोटबँक येते. बंगालमध्ये राहून तृणमूल संभ्रम पसरवत आहे. बंगालमधील शरणार्थींना मी सांगू इच्छितो की, भाजपने सरकार अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या शरणार्थिंना नागरिकता देण्यासाठी बिल आणले आहे. ममता या विधेयकाला पाठिंबा देतील का हे त्यांनी सांगावे. 

 

 

कोलकात्यात भाजप बंगाल छोडो चे पोस्टर 
कोलकात्यात शुक्रवारी ‘भाजपा बंगाल छोडो’ चे पोस्टर लावण्यात आले. हे पोस्टर तृणमूलने लावले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तृणमूलने मात्र त्यांच्या पक्षाचा याच्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. 


परवानगीवरून झाला होता वाद 
आसाममध्ये एनआरसीबाबत झालेल्या गोंधळानंतर शाह यांनी पश्चिम बंगाल दौऱ्याची घोषणा केली होती. परवानगी मिळत नसल्याचे त्यांनी परवानगी मिळो अथवा नाही मी पश्चिम बंगालला जाणारच हवे तर मला ममतांनी अटक करावी असेही शहा म्हणाले होते. त्यावर ममता म्हणाल्या होत्या, शहांना ज्याठिकाणी जायचे त्यांनी जावे त्यांना कोणी अडवले आहे. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...