आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळ्यात प्रथमच आढळले सांबर, वाघाचा अधिवास असण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर असणाऱ्या गौताळा अभयारण्यात प्रथमच सांबर आढळले आहे. त्यामुळे या जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याचा दावा वन अधिकाऱ्यांनी केला आहे. दोन दिवसापूर्वी वनाधिकारी रत्नाकर नागापूरकर यांना पहाटे पाच वाजता हे सांबर दिसले.


'सर्व्हिक्स युनिकलर' सांबराचे शास्त्रीय नाव
सांबरची वर्गवारी हरणांच्या सारंग कुळात होते. या हरणांच्या मादींना शिंगे नसतात. नराची शिंगे भरीव असतात आणि ही शिंगे दरवर्षी उगवतात आणि गळतात. शिंगांची लांबी ११० सें. मी. पर्यंत असते. माद्या नेहमी कळप करून राहतात. नर शक्यतो एकटा राहतो. सांबराचे मुख्य अन्न गवत, पाने आणि फळे आहे. ही हरणे शुष्क आणि काटेरी वने सोडून सर्व ठिकाणी अधिवास करतात.


वाघाचे आवडते खाद्य : गौताळ्यात सांबरचे वास्तव्य आहे म्हणजे वाघाच्या अधिवासाची पूर्व सूचना आहे. कारण सांबर हरीण हे वाघाचे आवडते खाद्य आहे. या पूर्वी गौताळयामध्ये चितळ प्रजातीचे हरीण पाहायला मिळाले होते. हे दोन्ही वाघांचे खाद्य आहे. म्हणजेच गौताळ्यामध्ये पुन्हा एकदा वाघांच्या डरकाळ्यांचे आवाज ऐकू येण्याची दाट शक्यता आहे, असा दावा वनाधिकाऱ्यांनी केला आहे

बातम्या आणखी आहेत...