आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजात मुलीला कडाक्याच्या थंडीत काटेरी झाडांमध्ये फेकून गेली आई, अंगात घुसले काटे पण सोडली नाही जगण्याची जिद्द...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डुंगरपूर(राजस्थान)- शुक्रवारी रात्री 2 ते 3 वाजता जन्मलेल्या नवजात मुलीला कुटुंबीयांनी विना कपड्याची झाडांमध्ये फेकून फरार झाले. त्या ठिकाणी पडलेले रक्त पाहून हे दिसत आहे की, महिलाची प्रसुती त्याच ठिकाणी झाली आहे.


सकाळी मुले शाळेत जात होती तेव्हा त्यांना झाडांमधून रडण्याचा आवाज आला, त्यांनी जवळ जाऊन पाहिले की एक बाळ रडत आहे. रात्रभर थंडीत पडल्यामुळे तिची अवस्था खुप खराब झाली होती. घटना गुमानपूरा-मोकमपूरा गावाजवळची आहे. काट्यांमध्ये अडकलेल्या बाळाला पाहून मुलांनी गावातील लोकांना सांगितले. काही वेळातच अँम्बुलंस आणि पोलिस त्याठिकाणी आहे. त्यांनी पाहिले की, बाळाच्या आसपास खुप रक्त पडलेले होते.


3 वर्षांत 13 बाळ मिळाले 
मागील 3 वर्षात झाडांमध्ये नवजात बाळांना फेकण्याचे 13 प्रकरणे समोर आले आहेत, त्यापैकी 11 ना वाचवता आले आहे. सरकारने अशा प्रकरणासाठी जिल्हा मुख्यालयात पाळनाघर बनवले आहेत. या ठिकाणी बाळांना सुरक्षित ठेवले जाते.


प्रसुती तिथेच झाली 
झाडांमध्ये खुप रक्त पडलेले होते. इतके रक्त पाहून डॉक्टराच्या टीमने सांगितले की, त्याच ठिकाणी प्रसुती झाली असावी. इतके रक्त प्रसुतीच्या वेळसच निघते.


अनैतिक संबंध असल्याचा संशय
रूग्णालयात नेल्यावर मुलीवर उपचार सुरू झाला. डॉ. कल्पेश जैन यांनी सांगितले की, मुलीला सकाळी 7 वाजता आणले होते आणि तिची अवस्था पाहून असे दिसते की, तिची डिलीव्हरी तीन चार तासांपूर्वीच झाली असावी. तिचे वजन 1 किलो 600 ग्राम आहे, आणि डिलीव्हरी वेळेच्या आधीच झाली आहे. मुलीच्या शरीरात ऑक्सीजनची कमतरता होती, शिवाय शरीरात अनेक ठिकाणी काटे घुसले होते. सध्या प्रकृती नाजुक आहे पण वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी सांगितले की, हे अनैतिक संबंधाचे प्रकरण दिसत आहे, अशा प्रकरणात अब्रू जाईल या भितीने बाळांना फेकून दिले जाते. आणी शोध सुरू केला आहे आणि लवकरच आरोपी आईचा शोध घेतला जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...