आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान खानने रणबीर कपूरसोबतच्या कतरिना कैफच्या बिकनी फोटोवर दिली रिअॅक्शन, अनेक वर्षांनंतर असे बोलल्याने आनंदी होईल कतरिना 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. सलमान आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते हे सर्वांनाच माहिती आहे. पण दोघांचे नाते लवकरच मोडले आणि कतरिना रणबीर कपूरला डेट करु लागली. यादरम्यान कतरिना आणि करणबीरचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही फोटोज समोर आले होते. यामध्ये कतरिना बिकनीमध्ये दिसत होती. या फोटोवर वर्षांनंतर सलमानने पुन्हा रिअॅक्शन दिली आहे. तो म्हणाला - 'असे वाटते की, हा फोटो खोटा आहे आणि एडिट केले आहे.'


6 वर्षांपुर्वी हा फोटो लीक झाला होता तेव्हा होती वेगळी रिअॅक्शन 
- एकेकाळी सलमान खान आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत होते. पण हे नाते जास्त दिवस टिकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर कतरिना रणबीर कपूरला डेट करु लागली. यावेळी दोघ लिव्ह-इनमध्येही राहिले. यासोबतच एकत्र हॉलिडे एन्जॉय करताना दोघांचे फोटोजही समोर आले होते. हे पाहून सलमान म्हणाला होता - 'लोकांनी आपले पर्सनल फोटो असे बाहेर येऊ देऊ नये'
- आता पुन्हा सलमानने या फोटोवर रिअॅक्शन दिली आहे. एका न्यूज चॅनलसोबत बोलताना सलमान म्हणाला - 'पब्लिसिटी स्टंट होता आणि फोटो बनावट होता. मला वाटते की, फोटोमध्ये रणबीर आहे पण ती कतरिना वाटत नाही. चेहरा दुस-याचा आणि बॉडी दुस-याची... हा मॉर्फड फोटो होता.'
- सलमान म्हणाला - 'विचार करा, कुणी पर्सनल हॉलिडेवर आहे आणि कुणीतरी तो फोटो क्लिक करुन शेअर केला, किती वाईट काम आहे. हे आपल्या आई-बहिणींसोबतही होऊ शकते.'

बातम्या आणखी आहेत...