Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Newspaper women distributors now create own identity, people appreciate their work

मंंडे पॉझिटिव्ह : वृत्तपत्र वितरक महिलांना पूर्वी नावे ठेवणारेच आता देतात कौतुकाची थाप

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 11, 2019, 07:48 AM IST

वृत्तपत्र वितरणाच्या पुरुषप्रधान क्षेत्रात आता महिलांची आगेकूच, निर्माण केली वेगळी ओळख 

 • Newspaper women distributors now create own identity, people appreciate their work

  अहमदाबाद/औरंगाबाद- आज अंधारात महिलांना बाहेर पडण्यास अनेक गावे, शहरांत बंधने आहेत. मात्र, काही धाडसी महिला पहाटे घराबाहेर पडून कष्ट करतात आणि कुटुंबाला सावरतात. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्र वितरणाच्या क्षेत्रात आज अशा अनेक महिला कार्यरत आहेत. त्यांची संख्या कमी असली तरी यातील काही कष्टाळू आणि जिद्दी महिलांच्या या प्रातिनिधिक गाथा...

  पेपर टाकणे हे काही बाईचे काम नाही, असे म्हणणारेच आज देतात कौतुकाची थाप
  १८ वर्षांपासून मी घरोघरी सायकलवर पेपर टाकते. यात गैर काहीच वाटत नाही. मी बारावीनंतर अॅग्रिकल्चर कोर्सदेखील केला. आिर्थक स्थिती बेताची होती. पतीचे ऑपरेशन झाले. घरात कमावणारे कुणीच नाही. सर्व जबाबदारी माझ्यावर आली. पती पेपर टाकण्याचे जे काम करत होते तेच करायचे असे ठरवले. पेपर टाकणे बाईचे काम नाही म्हणत लोक नावे ठेवायचे. पण पेपर घेण्यासाठी मी सायकलवर पहाटे जात असे. जे लोक तेव्हा नावे ठेवत, तेच आज कौतुक करतात. पती खूप प्रोत्साहन देतात. तीनशे घरांमध्ये रोज पेपर टाकून मी स्टॉलही चालवते.
  - सुकेशिनी किशोर जाधव, (४०), औरंगाबाद

  पुढील स्लाइडव वाचा- आरोग्य सांभाळण्यासोबतच थोडा आर्थिक हातभारही


 • Newspaper women distributors now create own identity, people appreciate their work

  आरोग्य सांभाळण्यासोबतच थोडा आर्थिक हातभारही 
  सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत स्टॉलवर वृत्तपत्रांची विक्री करून पतीला मदत करते. ८ वाजता पती स्टॉलवर आले की नंतर वृत्तपत्र वितरणाचे माझे काम सुरू होते. दररोज ६ किमी चालून ३२५ अंक वाटप करावे लागतात. पतीचे आरोग्य सांभाळण्यासह माझे पायी फिरणे होते. पतीलाही अभिमान वाटतो. कुटुंबाला आर्थिक मदतही होते. मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून पहाटे पाच वाजता घरातील कामे उरकावी लागतात.

  - भाग्यश्री भारत माळवे, जेल रोड, नाशिक. 

   

  पुढील स्लाइडव वाचा- १७ वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीत पतीला देत आहे खंबीर साथ 

   

 • Newspaper women distributors now create own identity, people appreciate their work

  १७ वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीत पतीला देत आहे खंबीर साथ 
  माझे शिक्षण बारावी. १७ वर्षांपासून जेल रोडच्या सैलानी बाबा चौकात वृत्तपत्र विक्री करणाऱ्या पतीला मी खंबीर साथ दिली. वयाची पन्नाशी गाठली तरीही व्यवसायाची आवड असल्याने रोज सकाळी ६ ते ११ पर्यंत आणि शनिवार, रविवार संपूर्ण दिवस मी स्टॉलवर वृत्तपत्र विक्री करते. स्टॉलच्या माध्यमातून रोज मी ३५० अंकांची विक्री करते. कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. 
  - सुनीता किरण ठोसर, जेल रोड, नाशिक. 

   

  पुढील स्लाइडव वाचा- नातेवाइकाचा मृत्यू झाला, पण कामाला प्राधान्य दिले 

   

 • Newspaper women distributors now create own identity, people appreciate their work

  नातेवाइकाचा मृत्यू झाला, पण कामाला प्राधान्य दिले 
  २००६ मध्ये एका मोठ्या अपघातानंतर पतीला अपंगत्व आले. पतीचा उपचार व दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. एम.ए. बी.एड.पर्यंत माझे शिक्षण झाले आहे. मी टेलिफोन ऑपरेटची नोकरी सोडून वृत्तपत्र वितरणाचे काम सुरू केले. १२ वर्षांपासून काम करताना एखाद्या नातेवाईकाचे निधन झाले तरी मी कामाला प्राधान्य दिले. आज २ मुले इंजिनिअर आहेत. 
  - अंजली (५१), अहमदाबाद. 

   

Trending