आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 80 धावांनी विजय, गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनाही अपयश 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - वन डे मालिकेमध्ये भारताकडून सपाटून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने टी 20 मालिकेची सुरुवात मात्र दणक्यात केली आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 80 धावांनी मोठा पराभव केला. या विजयामुळे त्यांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

 

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण किवी फलंदाजांनी या निर्णय सार्थ ठरू दिला नाही. पहिल्या विकेटसाठी सैफर्ट आणि मनरो यांनी 86 धावांची भागीदारी केली. त्यांनी डावाची गतीही चांगली ठेवली. त्यानंतर आलेल्या विल्यमसन, टेलर आणि कगलजिन यांनीही डावात मोलाची भर घातली. त्याजोरावर किवी संघाने 220 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. सैफर्टने अवघ्या 43 चेंडूत सर्वाधिक 84 धावा केल्या. हार्दीक पांड्याने भारताकडून सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.  


220 धावांच्या आव्हानासह मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. रोहित शर्मा अवघा 1 रन करून बाद झाला. त्यानंतर शंकर आणि धवनने काहीशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण तेही फार काळ टिकले नाही. धवन 29 तर शंकर 27 धावांवर बाद झाले. त्यानंतर धोनीने एक बाजू लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या बाजुने साथ मिळाली नाही. क्रुणाल पांड्या वगळता इतर 6 फलंदाज दुहेरी धावसंख्याही करू शकले नाही. भारताचा संपूर्ण संघ 139 धावांतच गारद झाला. धोनीने सर्वाधिक 39 धावा केल्या. न्यूझीलंडच्या साऊथीने 3 तर फर्ग्युसन, सँटनर आणि सोधीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 

बातम्या आणखी आहेत...