आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर पुढचा मुख्यमंत्री वंचित आघाडीचाच ; प्रकाश आंबेडकरांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - आगामी मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीचाच असेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर अॅड. आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, खरे तर देवेंद्र फडणवीस स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना तसे म्हणता येत नाही. पुढचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर पुढचा मुख्यमंत्रीच वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे. 

३१ ऑगस्ट ही काँग्रेसला नव्हे, तर स्वत:ला अंतिम मुदत घातली होती, असे सांगत अजूनही काँग्रेससाठी आपले दरवाजे मोकळे आहेत, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. मात्र, विधानसभेच्या १४४ पेक्षा अधिक जागा काँग्रेसला देणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच आमच्या संभाव्य आघाडीत राष्ट्रवादी पक्ष असणार नाही. कारण राष्ट्रवादीची मते काँग्रेसला मिळत नाहीत, असे काँग्रेसवाले म्हणतात, मग आम्हाला तर ती कशी मिळतील, असे सांगत राष्ट्रवादीबरोबर वंचित आघाडी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठी वंचितचे उमेदवार, एकूण जागा तसेच आघाडीतील मित्रपक्ष यासंदर्भात निश्चितीचे काम सुरू आहे. चार-पाच दिवसांत सर्व काही स्पष्ट होईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...