आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील वर्षी फुटबॉलचा अंडर-१७ विश्वकप भारतात, त्यामुळे देशातील गावागावात, शहरात मुली फुटबॉल खेळणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय खेळ प्राधिकरण(साई) देशभरातील मुलींनी फुटबॉल खेळावा यासाठी अभियान सुरू करणार आहे. आता गावागावात आणि शहरांत मुली फुटबॉल खेळतील. प्राधिकरण हे काम अखिल भारतीय फुटबॉल महासंघासोबत मिळून करेल. ही सर्व तयारी पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशात होणाऱ्या मुलींच्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर केली जात आहे. साई खेलो इंडिया गर्ल्स लीग सुरू करत आहे. यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंगसह १० ते १२ खेळांचा समावेश केला आहे. म्हणजे, केवळ मुलींसाठी या खेळांची लीग सुरू होईल. यामध्ये अंडर-१७ पासून सुरुवात होईल. यानंतर अंडर-१३, अंडर-१५ ही सामील केले जाईल. एका लीगमध्ये १६ संघ खेळतील. प्रत्येक ठिकाणी वर्षातून ३० ते ४० सामने खेळवण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक शहरात कमीत कमी १६ संघ तयार केले जातील आणि त्यांच्यात सामने खेळवले जातील. यानंतर राष्ट्रीय संघ निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल. मुलींचा प्रत्येक स्पर्धेत सहभाग व्हावा हा गर्ल्स लीग सुरू करण्याचा उद्देश आहे.
 

मोहिमेत अंडर-१३ आणि १५ ही समाविष्ट करणार
> सिंधू म्हणाली- अशा स्पर्धेची आवश्यकता आह

बॅडमिंटनची वर्ल्ड चॅम्पियन पी.व्ही. सिंधू म्हणाली, खेलो इंडिया गर्ल्स फुटबॉल लीग काळाची गरज 
आहे. देश सुखी व निरोगी राहावा यासाठी प्रत्येक वयोगटातील मुलींनी प्रत्येक खेळात भाग घेतला पाहिजे

.
साई प्रशिक्षण देणार, तंत्रज्ञान व आर्थिक मदतही करणार
स्पर्धेच्या आयोजनासाठी साई तांत्रिक व आर्थिक मदत करेल. यासोबत मुलींना प्रशिक्षण देईल. एखाद्या टीमचे स्वत:चे मैदान असेल तर साई सुविधा उपलब्ध करेल. टीम स्थानिक स्तरावर प्रायोजकांना सहभागी करेल.
 

सामने सुटीच्या दिवशी, त्यामुळे अभ्यासात नुकसान नाही
या लीगमुळे मुलींच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही. लीगचे सामने शनिवारी आणि रविवारी होतील. या दिवसांशिवाय मधे सुट्या येत असतील तर, तेव्हाही सामने खेळवले जातील.