Home | Gossip | Next year on Valentine's Day four different types of film will be released, focus on taboo subjects

पुढच्यावर्षी व्हॅलेंटाइन डेला चार हटके चित्रपटांची होईल टक्कर, टॅबू सब्जेक्ट्सवर असेल फोकस

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 10:42 AM IST

जाणून घ्या या चित्रपटांच्या हटके थीमविषयी... 

 • Next year on Valentine's Day four different types of film will be released, focus on taboo subjects

  एंटरटेन्मेंट डेस्क : पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेनिमित्त अनेक राेमँटिक, मात्र 'जरा हटके' चित्रपटांची टक्कर हाेणाार आहे. यात 'शुभ मंगल ज्यादा सावधान', 'लव्ह आजकल 2' आणि 'मलंग' यांनी १४ फेब्रुवारी तारीख निवडली होती. आता झरीन खान आणि अंशुमान झा यांनी 'हम भी अकेले, तुम भी अकेले' चित्रपटदेखील याच दिवशी रिलीज करण्याची घोषणा केली. या सर्व चित्रपटांत एक बाब सारखीच आहे. हे सर्व चित्रपट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या आतापर्यंत कोणी हात न घातलेल्या विषयावर आधारित आहेत. आयुष्मान खुराणाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' गे लोकांच्या प्रेमकथेवर आधारित आहे.

  कार्तिक आर्यनचा 'लव्ह आजकल 2' मध्ये वयाचे अंतर आणि दोन वेगवेगळे धर्म मानणाऱ्या लोकांची प्रेमकथा आहे. आदित्य रॉय कपूरचा 'मलंग'चा विषय तर आतापर्यंत कुणीच हाताळला नाही, असे बोलले जात आहे. याशिवाय 'हम भी अकेले, तुम भी अकेले' या चित्रपटाविषयी जी माहिती समोर आली त्यात हीरो अंशुमान झा गे आहे, तर हीरोइन झरीन खान लेस्बियन आहे.

  कशी आहे या चित्रपटाची 'जरा हटके' थीम...
  चित्रपट
  : 'शुभ मंगल ज्यादा सावधान'
  विषय : गे लव्हर्सची प्रेमकथा.
  कलाकार : आयुष्मान खुराना

  चित्रपट : 'लव्ह आजकल 2'
  विषय : वयात अंतर आणि वेगवेळ्या धर्मावर आधारित आहे हा चित्रपट
  कलाकार : कार्तिक आर्यन, सारा अली खान

  चित्रपट : 'मलंग'
  कलाकार : आदित्य रॉय कपूर, दिशा पाटणी
  विषय : महत्त्वाच्या सामाजिक विषयावर आधारित.

  चित्रपट : 'हम भी अकेले, तुम भी अकेले'
  विषय : गे हीरो आणि लेस्बियन हीरोइनवर आधारित.
  कलाकार : अंशुमान, जरीन

  एक शेड्यूल पूर्ण, तीन दिवसांचे शूटिंग उरले...
  सूूत्राच्या मते, दोन वर्षांपूर्वी 'अंग्रेजी में कहते हैं' फेम हरीश व्यास बनवणार आहेत. याचा एक भाग दिल्ली, मेरठ, चंदिगड़मध्ये पूर्ण झाला. धर्मशाला आणि मॅक्लाॅडगंजमध्ये याचे तीन दिवसांचे शूट उरले आहे. चित्रपट पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे. कथेत रोड ट्रिपदेखील आहे. हीरो आणि हीरोइन चांगले मित्र असतात. त्या ट्रिपवर त्यांना एकमेकांविषयी कळते. त्यानंतर चित्रपटात कसे वळण येते ते पाहण्याजाेगे आहे.

  का येत आहेत अशा कथा...
  ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श अशा कथा येण्याचे कारण सांगत आहेत. ते म्हणतात..., वेळ आणि समाज बदलत आहे. लोकांना वास्तविक कथा आवडत आहेत. त्यामुळे असे विषय आणि पात्र नामी स्टार्सदेखील साकारत आहेत. उदाहरण म्हणून घेतले तर 'कपूर अँड सन्स आला होता. सोनम कपूरने 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' केला होता. आता आयुष्मान गे पात्र साकारणार आहे. भविष्यात मोठे कलाकारदेखील अशा प्रकारचे पात्र साकारू शकतात.

 • Next year on Valentine's Day four different types of film will be released, focus on taboo subjects
 • Next year on Valentine's Day four different types of film will be released, focus on taboo subjects
 • Next year on Valentine's Day four different types of film will be released, focus on taboo subjects

Trending