आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NGO Alleges 'good News' For Defaming Image Of IVF Centers, Petition Filed In Karnataka High Court

एनजीओने केला 'गुड न्यूज' वर आयव्हीएफ सेंटर्सची प्रतिमा खराब करण्याचा आरोप, कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : गेल्या शुक्रवारी रिलीज झालेला अक्षय कुमारचा चित्रपट 'गुड न्यूज' कायद्याच्या कचाट्यात सापडताना दिसत आहे. एका एनजीओने चित्रपटाच्या सब्जेक्टबद्दल कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी सांगितल्यानुसार, चित्रपट आयव्हीएफ सेंटर्सची प्रतिमा खराब करत आहे. चित्रपटाची कथा एका कंफ्यूजनवर आधारित आहे, ज्यामध्ये सेंटरमध्ये कपलच्या स्पर्मची अदला बदल होते. चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगले प्रदर्शन करत 17.56 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

याचिकेमध्ये काय म्हणाले आहे... 


इंग्रजी वेबसाइटनुसार याचिकेमध्ये लिहिले गेले आहे की, हा चित्रपट लोकांना भ्रमित करत आहे. हा पाहिल्यानंतर सामान्य लोकांना वाटेल की, भारताच्या आयव्हीएफ सेंटर्समध्ये याप्रकारच्या घटना होतात. त्यांनी चित्रपटाची रिलीज आणि प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी सांगितल्यानुसार, हा चित्रपट भले काल्पनिक असो, पण त्यामध्ये एक सेंटर प्रमोट केले गेले आहे. चित्रपटात दाखवले गेले आहे की, इंदिरा आयव्हीएफ सेंटरमध्ये एक अशाप्रकारच्या घटना होत नाही. यामुळे देशाच्या इतर सेंटर्सच्या प्रतिमेला नुकसान पोहोचते. 


मात्र चित्रपट कलाकार आणि मेकर्सने ही गोष्ट आधीच स्पष्ट केली होती की, सीरियस सब्जेक्टवर गंभीरतेने काम केले आहे. त्यांनी सांगितले की, सर्व कथेचा विषय गंभीरतेने हाताळलेला आहे आणि खूप सावधपणे हा चित्रपट बनवला आहे. 

चित्रपटाची कथा काय आहे... 


कथेमध्ये दोन कपल आहेत ज्यांचे आडनाव बत्रा आहे आणि दोघेही पेरेंट्स बनू शकत नाहीयेत. याचमुळे ते आयव्हीएफ टेक्निकचा आधार घेतात. पण त्यांच्या सारख्याच आडनावामुळे स्पर्मची अदला बदल होते. नंतर संपूर्ण चित्रपट कंफ्यूजनवर आधारित आहे. अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ, किआरा आडवाणी, करिना कपूर हे मुख्य भूमिका साकारत आहेत.