आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएस सारख्या दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचा संशय, NIA चे 16 ठिकाणी छापे, 10 जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ/दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने बुधवारी उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये 16 ठिकाणी तपास मोहीम राबवली. यादरम्यान 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दहशतवादी संघटना आयएसआयएस सारखी संघटना हरकत-उल-हर्ब ए इस्लाम सक्रिय होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर इनपुटच्या आधारे उत्तरप्रदेशच्या अमरोहामधील सैदपुरइम्मा गाव आणि दिल्लीच्या जाफराबादमध्ये छापेमारी करण्यात आली.  


युपी एटीएसचे आयजी असीम अरुण यांनी सांगितले की, बुधवारी एनआयएसह संयुक्त मोहीम राबवण्यात आली. तपास संस्थांची संशयितांवर दीर्घकाळापासून नजर होती. त्यांनी सांगितले की, उत्तर भारतात बॉम्ब स्फोटाचा कट रचण्याच्या आरोपात अमरोहामधून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तर इतर 5 जणांना पूर्वी दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...