आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टेरर फंडिंग' प्रकरणात सीमेपलिकडे व्यापार करणाऱ्या काश्मीरच्या 4 व्यापाऱ्यांच्या घरांवर एनआयएने मारला छापा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA)ने रविवारी 'टेरर फंडिंग' प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या चार व्यापारांच्या निवासस्थानावर छापा मारला. हे सर्व व्यापारी नियंत्रण रेषेच्या (LOC) पलीकडे व्यापार करत होते. स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफचे जवान एनआयएसोबत उपस्थित होते. एनआयएने फुटिरतावादी नेता सज्जाद लोनचे निकटवर्तीय व्यापारी आसिफ लोन, तनवीर अहमद, तारिक अहमद आणि बिलाल भट यांच्या घरावर ही कारवाई केली. 

 

24 पेक्षा अधिक फुटिरतावादी आणि व्यापारांना अटक

यापूर्वी एनआयएने शनिवारी पुलवामा आणि श्रीनगरमध्ये सात ठिकाणी छापा टाकला होता. सुत्रांच्या मते, एनआयए आणि ईडीने काश्मीरमध्ये 24 पेक्षा अधिक फुटिरतावादी नेते आणि व्यापारांना 'टेरर फंडिंग' प्रकरणात अटक केली आहे. 

 

माजी फुटिरतावाद्यांविरोधात देखील कारवाई केली
एनआयएने 23 जुलै रोजी श्रीनगरचे व्यापारी गुलाम अहमद वानी ऊर्फ बर्दाना विरोधात कारवाई केली होती. बर्दाना एलोसीच्या पलिकडे श्रीनगर आणि पीओकेच्या मुजफ्फराबादमध्ये व्यापार करतो. बर्दानाचा मुलगा तनवीर अहमद माजी फुटिरतावादी होता. तनवीर सध्या एलओसीपार व्यापार असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 

 

8 मार्च रोजी सीमेपलिकडील व्यापार बंद करण्यात आला होता
14 फेब्रुवारी रोजी पुलवाम्यात सीआरपीएफ जवानांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्यानंतर 8 मार्च रोजी येथील व्यापार बंद करण्यात आला होता. याच दिवसापासून पीओके ते श्रीनगर 'कारवां-ए-अमन' बस देखील बंद करण्यात आली होती. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले होते. 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.