आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआयएची ‘इसिस’च्या केरळ, तामिळ माॅड्यूलविराेधात दुसऱ्यांदा छापेमारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेइम्बतूर - काेइम्बतूर एनआयए तपास संस्थेने तमिळनाडू आणि केरळमध्ये ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयितांच्या विराेधात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी धाड टाकण्याची कारवाई केली. महसूल आणि पाेलिस अधिकाऱ्यांनी दुस ऱ्या दिवशी माेहम्मद हुसेन, शाहजहाॅ आणि हयातुल्ला या तीन लाेकांच्या घरी पहाटे ४.३० वाजताच धाड मारली. दक्षिण भारत विशेष करून तामिळनाडु आणि केरळमध्ये युवकांना अतिरेकी संघटनेत भरती करणे आणि हल्ल्याचा कट रचण्याच्या आराेपाखाली एनआयएने ३० मे राेजी अझरुद्दिन शेख, शेख हिदायतुल्लाह, अकरम सिंधा, अबूबकर एम, सद्दाम हुसेन आणि इब्राहिम ऊर्फ शाहिदविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. हे सर्व काेयंबटूर येथे राहणारे आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी एनआयएने सात जागी धाड मारून कारवाई केली. 


तमिळनाडू ‘इसिस’चा मास्टरमाईंड माेहम्मद अझरुद्दीन यासह सहा जणांना अटक करण्यात आली. अझरुद्दीन ‘खिलाफहजीएफएक्स’ फेसबुक पेजच्या माध्यमातून ‘इसिस’चा प्रचार करत हाेत आणि युवकांना  जिहादसाठी प्रेरित करत हाेता. ताे श्रीलंकामध्ये २१ एप्रिल राेजी झालेल्या बाॅम्बस्फाेटातील मुख्य आराेपी जहरान हाशिमचा फेसबूक मित्र आहे. श्रीलंकामध्ये इस्टरच्य दिवशी झालेल्या बाॅम्बस्फाेटात ११ भारतीयांसमवेत २५८ लाेक ठार झाले हाेते. या धाडीमध्ये एनआयएने १४ माेबाईल, २९ सिमकार्ड, १० पेन ड्राईव्ह, तीन लॅपटाॅपसह अनेक संदिग्द साहित्य जप्त केले आहे. या अगाेदर मे महिन्यात एनआयएने तमिळनाडूत १० ठिकाणी छापेमारी केली हाेती. त्यावेळी देखील एनआयएने इसिसच्या संशयित दहशतवाद्यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला हाेता. या तपास संस्थेने गेल्या महिन्यात चेन्नईमध्ये शाेध माेहीम राबवली हाेती.