आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- दिल्ली हायकोर्टाने कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणलेल्या निर्भयाच्या चारही गुन्हेगारांसह तिहार तुरुंगाचे महासंचालक, तुरुंग अधीक्षकांना नोटीस जारी केली आहे. हायकोर्टाने रविवारी त्यांच्याकडून उत्तर मागवले आहे.
गुन्हेगारांच्या फाशीला स्थगिती देण्याच्या पतियाळा हाऊस कोर्टाच्या आदेशाविरुद्ध केंद्र सरकारने शनिवारी हायकोर्टात याचिका दाखल केली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी म्हटले की, गुन्हेगार कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून कायद्याशी खेळत न्यायाची खिल्ली उडवत आहेत. त्यांना असे करण्याची परवानगी दिली जाऊ नये. यावर रविवारी दुपारी ३ वाजेपासून सुनावणी सुरू होणार आहे.
दुसरीकडे, तिहार प्रशासनानेही पतियाळा हाऊस कोर्टात याचिका दाखल करून चारही गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी नवीन डेथ वाॅरंट जारी करण्याची मागणी केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी केली जाणार आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशात चारही गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेवर पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली होती.
विनयचा अर्ज फेटाळला, अक्षयचाही दयेचा अर्ज
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी निर्भयाचा गुन्हेगार विनय शर्मा याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे.
आणखी एक गुन्हेगार अक्षय ठाकूरनेही दयेचा अर्ज दाखल केला आहे. तिहारचे महासंचालक संदीप गोयल यांनी ही माहिती दिली. मुकेश आणि पवन या दोन गुन्हेगारांचा दयेचा अर्ज अाधीच फेटाळला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.