आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आईवडिलांसोबत भारतात आला निक, एअरपोर्टवर आईवडिलांच्या हातात दिसले गिफ्ट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड निक जोनास त्याच्या आईवडिलांसोबत भारतात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी तो आईवडिलांसोबत मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी निकच्या गळ्यात सोन्याची चेन तर आईवडिलांच्या हातात काही गिफ्ट्स दिसले. बातम्यांनुसार, निक आणि त्याचे आईवडील भारतात प्रियांकाच्या पार्टीसाठी आले आहेत. प्री-वेडिंग विधी सुरु करण्यापूर्वी प्रियांका तिच्या कुटुंबीयांची भेट निकच्या आईवडिलांशी घालवून देत आहे. यासाठी निक त्याच्या पेरेंट्ससोबत भारतात आला आहे. या भेटीनंतर प्रियांका एंगेज्मेंट पार्टी देणार असल्याचे समजते. प्रियांका आणि निकच्या कुटुंबीयांची ही पहिली मीटिंग असेल. दोघांचे लग्न भारतीय पद्धतीने होणार आहे. 

 

निकने साखरपुड्याला प्रियांकाला घातली 1.40 कोटींची रिंग... 
- अलीकडेच प्रियांका चोप्रा बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी तिच्या अंगठीची जास्त चर्चा झाली.
- असे म्हटले जाते की, ही रिंग प्रियांकाच्या साखरपुड्याची आहे. या डायमंड अंगठीची किंमत  $200,000 (सुमारे 1.40 कोटी रुपये) आहे.
- रिपोर्ट्सनुसार, हा दावा डब्ल्यू पी डायमंडचे प्रेसिडेंट एंड्रू ब्राउन यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केला जातोय. काही दिवसांपूर्वीच प्रियांका भारतात परतली, तेव्हा दिल्ली एअरपोर्टवर तिने रिंग काढून ठेवली होती.

 

जुलैमध्ये झाला निक-प्रियांकाचा साखरपुडा...
- रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाच्या 36 व्या वाढदिवशी म्हणजे 18 जुलै रोजी लंडनमध्ये तिचा साखरपुडा झाला. अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जेव्हा प्रियांकाने अचानक सलमान खानचा 'भारत' हा चित्रपट सोडला, तेव्हा निकसोबत ती लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली. 

- दरम्यान प्रियांकाच्या आत्याने DainikBhaskar.com सोबत केलेल्या बातचीतमध्ये म्हटले की, ''आम्ही सगळेच दोघांच्या निर्णयाने आनंदी आहोत. 18 जुलै रोजी सगळे प्रियांकाच्या घरी हजर होते. यापूर्वी कुटुंबातील आम्ही काही जण अमेरिकेत निकच्या घरी गेलो होतो. लवकरच दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित केली जाईल."

 

प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे निक...
- 'क्वांटिको' या टीव्ही शोदरम्यान 35 वर्षीय प्रियांकाची भेट तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षे लहान असलेल्या अमेरिकन सिंगर निक जोनास (25) सोबत एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती.

- डेटिंगच्या बातम्या समोर आल्यानंतर दोघांचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये प्रियांका निकसोबत क्वॉलिटी वेळ घालवताना दिसली होती.

- प्रियांका आणि निक यांच्यापैकी अद्याप एकानेही आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही. 
- प्रियांका अटलांटिक सिटीत झालेल्या निकच्या बहिणीच्या लग्नात सहभागी झाली होती. तिने फादर्स डेच्या दिवशी निकच्या वडिलांना इंस्टाग्रामवर फॉलो करायला सुरुवात केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...