आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नावेळी आपल्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाली प्रियांका, पण सास-यांचा दिलदारपणा पाहून सर्वांनी केले कौतूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. प्रियांका चोप्राने शनिवारी स्वतःपेक्षा 10 वर्षे लहान विदेशी बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लग्न केले. ख्रिश्चन पध्दतीने तिने हे लग्न केले. जोधपुरच्या उम्मेद भवनात हा विवाहसोहळा पार पडला. रविवारी दोघांनी हिंदी पध्दतीने लग्न केले. डिएनएच्या रिपोर्टनुसार, लग्नाच्या एका प्रथेदरम्यान प्रियांका आपले वडील अशोक चोप्रा यांच्या आठवणीत भावूक झाली. तेव्हा निकचे वडील पॉल केविन यांनी परिस्थिती सांभाळून घेतली. त्यांनी प्रियांकाच्या वडिलांची जागा घेत जबाबदारी सांभाळली. 

 

निकच्या वडिलांनी प्रियांकाचा हात त्याच्या हातात सोपवला 
ख्रिश्चन पध्दतीमध्ये नवरी आपल्या वडिलांचा हात पकडून नवरदेवाजवळ पोहोचते. नंतर नवरीचे वडील मुलीचा हात नवरदेवाच्या हातात देतात. पण 5 वर्षांपुर्वीच 2013 मध्ये प्रियांकाच्या वडिलांचे निधन झाले होते. अशा वेळी निकचे वडील केविन जोनास यांनी प्रियांकाचा हात आपल्या मुलाच्या हातात देऊन जबाबदारी पार पाडली. लग्नाच्या वेळचा हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांनी केविन जोनासची स्तुती केली. 

 

प्रियांकाने बनवला डॅडीज लिटल गर्लचा टॅटू
प्रियांका एका मोठ्या कुटूंबातील आहे. तिचे वडील आर्मी ऑफिसर होते आणि ती वडिलांच्या खुप जवळ होती. तिची आई मधु चोप्रा डॉक्टर आहेत. त्या आता प्रियांकाला बिझनेसमध्ये मदत करतात. प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांना कॅन्सर होता यामुळे 2013 मध्ये त्याचे निधन झाले. वडिलांच्या जाण्याचे दुःख प्रियांकाला आजही आहे आणि याचा उल्लेख तिने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. प्रियांका नेहमीच आपल्या वडिलांसोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रियांकाच्या हातावर वडिलांसोबतच्या नात्याविषयीचा एक टॅटू आहे. तिने डॅडीज लिटल गर्ल असा टॅटी काढला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...