आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाला पहिल्यांदा नववधूच्या रुपात बघून निक जोनासचे पाणावले होते डोळे, वेडिंग सूटवर पत्नीसाठी लिहिला होता स्पेशल मेसेज, प्रियांकाच्या गाऊनवर लिहिली होती तीन खास लोकांची नावे : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः स्वतःपेक्षा दहा वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत प्रियांका चोप्रा विवाहबद्ध झाली आहे. पीपल्स या इंटरनॅशनल मॅगझिनने मंगळवारी प्रियांका-निकच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज रिलीज केले आहेत. यापैकीच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत प्रियांकाला बघून निक इमोशनल झालेला दिसतोय. झाले असे की, ख्रिश्चन वेडिंग वेळी व्हाइट गाऊन परिधान करुन प्रियांका तिची आई मधू चोप्रासोबत विवाहस्थळी दाखल होत असताना तिला बघून निकचे डोळे पाणावले होते. 

 

ख्रिश्चन वेडिंगचे 3 हाइलाइट्स

1. निकने ख्रिश्चन वेडिंगवेळी जो सूट घातला होता, त्यावर 'मेरी जान' हे शब्द लिहिले होते. हे शब्द उर्दूत लिहिण्यात आले होते.  

2. पीसीच्या गाऊनवर निक, आई मधू चोप्रा, वडील अशोक चोप्रा यांची नावे लिहिली होती. याशिवाय ओम नम: शिवाय हा मंत्र, होप, फॅमिली, लव्ह, कम्पॅशन हे शब्दही गाऊनवर लिहिण्यात आले होते. पीसीच्या गाऊनवर लग्नाची तारीखही नमूद करण्यात आली होती.  
3. प्रियांका-निकने लग्नानंतर 18 फूट उंच केक कापला होता. हा केक निकच्या पर्सनल शेफने बनवला होता. मजेशीर गोष्ट म्हणजे हा केक प्रियांका आणि निक यांनी चाकूने नव्हे तर तलवारीने कापला होता.  

 

प्रियांकाने शेअर केल्या खास गोष्टी...
पीपल्स  या इंटरनॅशनल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते,  'लग्नापूर्वी मी खूप घाबरले होते. पण जेव्हा मी निकला बघितले, तेव्हा माझी भीती नाहीशी झाली. प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की, लग्नात ती राजकुमारीसारखी दिसावी. पण मी स्वतःविषयी असे काहीही प्लानिंग केले नव्हते.' 

बातम्या आणखी आहेत...