प्रीमियरनंतर अडखळली प्रियांका / प्रीमियरनंतर अडखळली प्रियांका चोप्रा, पडता-पडता वाचली

निक जोनासने पब्लिकली प्रियंकाला केले Kiss, चित्रपटाच्या प्रीमियरला एकत्र पोहोचले होते पती-पत्नी: VIDEO 

Feb 13,2019 03:01:00 PM IST

मुंबई - प्रियांका चोप्राचा अपकमिंग चित्रपट 'इझंट इट रोमँटिक'चा प्रीमियर सोमवारी रात्री लॉस एंजलिसमध्ये झाला. या प्रीमियरसाठी प्रियांका पती निक जोनाससोबत पोहोचली होती. शोपुर्वी निकने प्रियंकाला पब्लिकली किस केले आणि चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. या कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


प्रीमियरनंतर पडता-पडता वाचली प्रियांका
- प्रीमियर संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जात असताना प्रियांका अचानक स्लिप झाली परंतु लगेच तिने स्वतःला सावरले अन्यथा खाली पडली असती. तिचा गाऊन पायामध्ये अडकला असल्याचे सांगण्यात येत आहे. 'इझंट इट रोमँटिक' हा प्रियांकाचा तिसरा हॉलिवूड चित्रपट आहे. यापूर्वी ती 'बेवॉच' आणि 'अ किड लॅक जॅक' मध्ये दिसली होती. बॉलिवूडमध्ये लवकरच प्रियांका 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसेल.

X