एन्टटेन्मेंट डेस्क: प्रियांका चोप्रासोबत साखरपुडा केल्यानंतर अमेरिकी सिंगर निक जोनास यूएसला रवाना झाला आहे. रविवारी रात्री निक आपल्या आई-वडिलांसोबत एयरपोर्टवर स्पॉट झाला. निकला एयरपोर्टवर पाहताच मीडिया फोटोग्राफर्सने त्याला घेरले. फोटोग्राफर्सने निकला एका फॅमिली फोटोसाठी रिक्वेस्ट केली. यावेळी निकने त्यांना निराश केले नाही. त्याने आई-वडिलांसोबत पोज दिली. एयपोर्टवर प्रियांकाचे सासु-सासरे एकमेकांचा हात पकडून चालत होते. यावेळी निक वेलेंटिनो ब्रांडची ब्लॅक कलरची गुड, टाइजर आणि व्हाइट स्नीकर्समध्ये दिसला. यावेळी प्रियांका दिसली नाही. ती सासु-सास-यांना सी-ऑफ करण्यासाठी एयपोर्टवर आली नव्हती. शनिवारी (18 ऑगस्ट) प्रियांका आणि निकचा साखरपुडा आणि पार्टी झाली. पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड सेलेब्स दिसले. पार्टीमध्ये निक आणि त्याचे पालक भारतीय अटायरमध्ये दिसली होते.