आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकासोबत पूजेत हात जोडून बसला निक, इंडियन लूकमध्ये दिसले भावी सासू-सासरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत ऑफिशिअली एंगेज्ड झाली आहे. शनिवारी सकाळी मुंबईतील तिच्या राहत्या घरी तिची रोका सेरेमनी पार पडली. लवकरच प्रियांका मिसेस जोनास होणार आहे. रोका सेरेमनीनंतर रात्री मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रियांका आणि निकची एंगेज्मेंट पार्टी पार पडणार आहे. रोका सेरेमनीत प्रियांका आणि निक दोघेही भारतीय पारंपरिक पोशाखात दिसले. एकीकडे प्रियांका यलो कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसली. तर निकदेखील व्हाइट कलरच्या शेरवानीत हॅण्डसम दिसला. या दोघांव्यतिरिक्त निकच्या आईवडिलांनीही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. 

 

रोका सेरेमनीत प्रियांकाच्या भावी सासूबाई मिलर जोनास आणि सासरे केविन जोनास हे देखील इंडियन लूकमध्ये दिसले. मिलर जोनास यांनी पंजाबी सूट परिधान केला होता. तर केविन यांनी व्हाइट कलरचा कुर्ता-पायजामा घातला होता. रोका सेरेमनी आणि एंगेज्मेंट पार्टीसाठी हे दोघेही गुरुवारीच निक जोनाससोबत मुंबईत दाखल झाले.   

बातम्या आणखी आहेत...