आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Got Luxurious Gift By Husband Nick Jonas Mother Denise: Parineeti Chopra Jiju Nick Jonas Promise To Take Care Of Her Sister Priyanka For Life Long

सासूबाईंनी प्रियांकाला दिले लाखमोलाचे झुमके, 170 हि-यांनी तयार झालेल्या या झुमक्याची किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अमेरिकन गायक निक जोनास आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि आता ऑफिशिअली पती-पत्नी झाले आहेत. 1 डिसेंबर रोजी जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न झाले. त्यानंतर दोघांनी हिंदू पद्धतीनेही लग्नगाठ बांधली. प्रियांकाच्या सासूबाई डेनिस जोनास यांनी तिला एक खास आणि तेवढेच महागडे गिफ्ट दिले आहे. जोनास कुटुंबियांनी त्यांच्या घरातील दुस-या सुनेचे स्वागत अतिशय फ्रेमाने केले आहे. बातमी आहे की, डेनिस यांनी त्यांची सून प्रियांकाला अतिशय महागडे झुमके गिफ्ट केले आहेत. या इअररिंगची किंमत  79,500 डॉलर अर्थातच भारतीय चलनानुसार तब्बल 55.46 लाख रुपये इतकी आहे. या कानातल्यांचं वजन 6.7 कॅरेट असून त्यात 170 लहान लहान हिरे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सासूकडून मिळालेले हे गिफ्ट प्रियांकासाठी फारच मौल्यवान आहे.

 

प्रियांका-निकचे वचन ऐकून इमोशनल झाले कलाकार...  

ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या लग्नाच्या वेळी व्हॉयलिन वाजवणारी कलाकार कुष्मिताने एका पोस्ट शेअर करुन सांगितले की, जेव्हा तिने निक आणि प्रियांका यांनी एकमेकांना दिलेले वचन ऐकले तेव्हा ती अतिशय इमोशनल झाली होती. हे वचन दोघांनी लिहून आणले होते. कुष्मिता स्वतःला नशीबवान समजते की, तिला प्रियांकाच्या लग्नात परफॉर्म करण्याची संधी मिळआली. 

 

निकने मेहुणी परिणीतीला दिले वचन... 

- परिणीती चोप्राने तिची ताई प्रियांकाच्या मेंदी सेरेमनीचा एक फोटो पोस्ट केला, त्यात ती खूप उत्साही दिसत आहे.


- परिणीतीने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले, "नवरीच्या मैत्रिणीचे काम तिला पूर्ण वेळ आनंदी आणि कम्फर्टेबल ठेवणे असते. आम्हाला या गोष्टीची काळजी करण्याची काही गरज नाही. कारण निकने आम्हाला वचन दिले आहे की, तो आयुष्यभर प्रियांकाला आनंदी ठेवेल.  वेलकम टू द फॅमिली निक जीजू. मी खूप आनंदी आहे की, जोनास आणि चोप्रा फॅमिली आता एकत्र आली आहे."

 

प्रियांका-निकचे होणार 2 रिसेप्शन... 
- निकयांकाच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ शूट करण्याची जबाबदारी अनुष्का-विराट आणि दीपिका-रणवीरचे लग्न कव्हर करणा-या कंपनीला देण्यात आली आहे. लग्नानंतर प्रियांका दोन रिसेप्शन देणार आहे. एक रिसेप्शन 4 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. तर मुंबईतील रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड कलाकार सहभागी होणार आहेत. अद्याप या रिसेप्शनची तारीख जाहिर झालेली नाही.


- सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका-निकच्या लग्नाच्या कव्हरेजचे सुमारे अडीच मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...