आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या भावी पतीचा खुलासा - सांगितले, कुठे आणि कशी झाली होती प्रियांकासोबतची पहिली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भावी पती आणि सिंगर निक जोनासने अमेरिकेच्या एका  चॅट शोमध्ये प्रियांका आणि त्याच्या रिलेशनविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपल्या लव्ह लाइफविषयी बोलताना निक म्हणाला,  मी आणि प्रियांका आमच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून संपर्कात आलो होतो. सुरुवातीला आम्ही फक्त टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून बातचित केली. सुमारे सहा महिन्यांनंतर आम्ही दुस-यांदा भेटलो. मे 2017 मध्ये मेट गाला इव्हेंटवेळी आम्ही दोघे फक्त मित्र म्हणून रेड कार्पेटवर एकत्र चाललो होतो. 


5 महिन्यांपूर्वीच आम्ही आमचे नाते नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला... 

चॅट शोमध्ये होस्ट जिमी फॉलनसोबत बोलताना निक म्हणाला, हळूहळू आमच्या नशीबाने आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आणले. त्यानंतर आम्हीच एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवू लागलो. निकने सांगितल्यानुसार, पाच महिन्यांपूर्वीच दोघांची त्यांच्या रोमँटिक नात्याला नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हे खरं तर थोडे घाईतच घडले. पण आमचा निर्णय योग्य आहे, असे निक म्हणाला.  


18 ऑगस्ट रोजी झाली प्रियांका-निकची रोका सेरेमनी...
18 ऑगस्ट रोजी प्रियांका आणि निकच्या फॅमिली मेंबर्स आणि खास मित्रांच्या उपस्थित दोघांची रोका सेरेमनी पार पडली. या खास कार्यक्रमासाठी निक त्याचे वडील केविन आणि आई डेनिससोबत भारतात आला होता. सकाळी रोका सेरेमनी पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रियांकाच्या राहत्या घरीच पार्टी झाली होती. या पार्टीत आलिया भट, विशाल भारद्वाज, सिद्धार्थ रॉय कपूर पोहोचले होते. अद्याप दोघांची लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. रोका सेरेमनीपूर्वी प्रियांका निकसोबत हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली होती.  

 

बातम्या आणखी आहेत...