आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 20 दिवसांनंतर प्रियांकाच्या पतीने सांगितला मॅरीड लाइफचा पहिला रूल, मेट गाला इवेंटचा फोटो पोस्ट करून म्हणाला - नेव्हर स्टेप ऑन हर ट्रेन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला आता 20 झाले आहेत. यादरम्यान कपलने दोन रिसेप्शन दिले आहेत. निक आणि प्रियांकाची लव लाइफ, मॅरीड लाइफ कशी असेल आणि निक हे नाते कसे निभावत आहे हे तो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहे. निकने मॅरीड लाइफचा पहिला रूल दोन फोटोजसोबत शेयर केला आहे. कपल म्हणून निक आणि प्रियांका चोप्रा मेट गाला इवेंटमध्ये पहिल्यांदा जगासमोर आले होते. जेथे दोघांनीही रॉल्फ लॉरेनने डिझाईन केलेले ड्रेसेस परिधान केले होते. या इवेंटचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये निक प्रियांकाच्या ड्रेसच्या ट्रेनला मागे वळून पाहत होता की, कदाचित त्याचा पाय तर त्या ट्रेनवर पडला नाही ना.  

 

लग्नात रीक्रिएट केला होता मेट गाला सीन...
जोधपुर मध्ये ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नादरम्यान निक आणि प्रियांकाने मेट गालाचा तोच सीन पुन्हा रीक्रिएट केला होता, येथेही निक प्रियांकाच्या वेडिंग गाउनच्या 75 फुट लॉन्ग् वेलला तसाच पाहत होता जसे मेट गालामध्ये पहिले होते, की त्याचा पाय तर त्या ट्रेनवर पडत नाही ना. 

 

निकच्या पोस्टवर प्रियांका चोप्रानेही रिप्लाय केला आहे. ज्यामध्ये तिने लिहिले,  तुम्हाला हे नेहमीच ठाऊक होते मिस्टर. 19 डिसेंबरला मुंबईमध्ये झालेल्या रिसेप्शनमधेही प्रियंका मीडियाशी निकचे इंट्रोडक्शन करून देतानाही म्हणाली होती, हे आहेत माझे पती निक जोनस. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Rule number one... never step on her train. 😂 @priyankachopra

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on Dec 20, 2018 at 12:53am PST

 

बातम्या आणखी आहेत...