आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका-निकच्या संगीत सेरेमनीवर बेस्ड वेब सीरीज बनणार, 2020 मध्ये अॅमेझॉनवर होईल स्ट्रीमिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निक-प्रियंका यांनी नुकताच आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. आता ते ‘संगीत सेरेमनी’ची निर्मिती करणार आहेत. दोघेही आपल्या लग्नातील संगीत सोहळ्यापासून प्रेरित होत एक वेब सीरीज बनवणार आहेत. या सीरीजमध्ये निवडक जोडप्यांच्या संगीत सोहळ्यांचे चित्रिकरण केले जाईल. प्रोजेक्टअंतर्गत सेलेब्रिटी कोरियोग्राफर्स, स्टायलिस्ट आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर्स २०२० मध्ये लग्न करणाऱ्या जोडप्यांचे लग्न स्पेशल बनवण्याच्या कामी लागतील. ही सीरीज अॅमेझॉनवर प्रसारित होईल. प्रियंका चोप्राच्या लग्नामध्ये तिच्या आणि आणि निकच्या घरच्या लोकांमध्ये एक डांस ऑफही झाला होता. आता हे जोडपे आपल्या चाहत्यांनाही अशाच प्रकारच्या आयोजनाची संधी देत आहेत.  यासंदर्भात माहिती देताना प्रियंकाने एका पोस्ट शेअर करत लिहिले, ‘आमच्या लग्नात दोन्ही कुटुंबांनी मिळून संगीत सोहळ्यात सादरीकरण केले होते. त्यामध्ये आमची प्रेमकथा सांगण्यात आली होती. निक आणि मी एका नवीन प्रोजेक्टची घोषणा करत असताना खूप उत्साहित आहोत. अद्याप त्याचे शीर्षक निश्चित केले नाही. याअंतर्गत आम्ही लग्नाच्या पूर्वसंध्येला होणारे संगीत सेलीब्रेट करणार आहोत. त्यात कुटुंब आणि मित्र एकत्र येतात. हा आमचा संगीत प्रोजेक्ट असून एत्रितपणे केलेला पहिला प्रोजेक्टही आहे. लवकरच लग्नाच्या बंधनात बांधल्या जाणाऱ्या जोडप्यांसोबतही आम्ही हा अनुभव शेअर करणार आहोत. तुम्ही २०२० च्या उन्हाळ्यामध्ये लग्न करत असाल तर आम्ही या सोहळ्यात सहभागी होत हा अनुभव आणखी शानदार बनवण्यामध्ये तुमची मदत करू इच्छित आहोत.’